14 षटकार मारुन धावांचा पाऊस पाडला, गोऱ्या मॅम फिदा, आयुष्यभर साथ देण्याचं वचन, पाहा तो क्रिकेटर कोण?

वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू त्याच्या कारकिर्दीत अव्वल दर्जावर असताना एका कसोटी मालिकेत रणांचा डोंगर उभा करु हा अष्टपैलू फलंदाज रातोरात हिरो झाला होता. कसोटी मालिकेत 14 षटकार ठोकणाऱ्या या खेळाडूचा खेळ सर्वांचेच मनोरंजन करायचा

14 षटकार मारुन धावांचा पाऊस पाडला, गोऱ्या मॅम फिदा, आयुष्यभर साथ देण्याचं वचन, पाहा तो क्रिकेटर कोण?
वसिम राजा
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 12:06 PM

कराची : टीम इंडियाचा स्टायलिश फलंदाज युवराज सिंग (Yuvraj Singh) आपल्या धाकड खेळीमुळे कायमच सर्वांचे मनोरंजन करत होता. डावखुरा अष्टपैलू खेळाडू म्हणून युवराजप्रमाणे आणखी एका खेळाडूला क्रिकेट इतिहासांत मोठा मान आहे. हा खेळाडू भारतीय नसून भारताचा शेजारी देश पाकिस्तानचा होता. वसीम राजा (Wasim Raja) असे या दिग्गज खेळाडूचे नाव असून वसीम यांचा आज वाढदिवस. 3 जुलै, 1952 रोजी पाकिस्तानच्या मुल्तान येथे जन्म झालेल्या वसीम यांनी 1970 आणि 1980 च्या दशकात पाकिस्‍तान क्रिकेट संघात (Pakistan Cricket Team) एक उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी पार पाडली होती. (Pakistani All Rounder Cricketer Wasim Raja Birthday Today know some special things about wasim raja)

वसीम राजा यांनी वेस्‍टइंडीज विरोधात 11 कसोटी सामने खेळले.ज्यात 57 च्या सरासरीने वसीम यांनी धावांचा पाऊस पाडला होता. यातील सर्वात यादगार मालिका म्हणजे 1976-77 ची  वेस्‍टइंडीज विरुद्ध खेळलेली. या मालिकेत वसीम यांनी तब्बल 14 षटकार ठोकत 517 धावांचा डोंगर रचला होता. विशेष म्हणजे गोलंदाजीतही कमाल केली होती. कारकिर्दीत कसोटी सामन्यात पटकावलेल्या 51 विकेट्समधले 33 विकेट्स हे वसीम यांनी परदेशात पटकावले होते. वसीम यांनी धाकड क्रिकेट कारकिर्दीनंतर इंग्‍लंडच्याच एका मुलीशी विवाह करत घर बसवला आणि तिकडेच रहायला लागले. ऑगस्‍त, 2006  मध्ये वयाच्या 54 व्या वर्षी वसीम यांचे निधन झाले, वसीम यांचा छोटा भाऊ रमीज राजा हाही माजी पाकिस्तानी क्रिकेटर आहे.

वसीम राजा यांची क्रिकेट कारकिर्दी

वसीम राजा यांनी 57 कसोटी सामन्यात 36.16 च्या सरासरीने 2 हजार 821 धावा केल्या. ज्यात 4 शतकांसह 18 अर्धशतकांचा समावेश आहे. 125 हा त्यांचा सर्वोच्च स्कोर आहे. तर एकदिवसीय सामन्यांचा विचार करता 54 एकदिवसीय सामन्यांत 22.34 च्या सरासरीने वसीम यांनी 782 धावा केल्या. ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. वसीम यांनी 250 प्रथम श्रेणी सामन्यांत 35.18 च्या सरासरीने 11 हजार 434 धावा केल्या आहेत. ज्यात 17 शतकांचा समावेश आहे. गोलंदाजीचा विचार करता वसीम यांनी 57 टेस्‍टमध्ये 51 आणि 54 वनडेमध्ये 21 विकेट्स घेतल्या. तर 250 प्रथम श्रेणी सामन्यांत 558 विकेट्स पटकावले आहेत.

हे ही वाचा :

Ind vs Eng : शुभमन गिलच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी द्या, रनमशीन वसीम जाफरचा महत्त्वाचा सल्ला

आज ब्लू है पानी पानी, टीम इंडियाची श्रीलंकेत धमाल मस्ती, पाहा PHOTO

भारत-श्रीलंका दौऱ्यापूर्वी वादाला तोंड, पाच खेळाडूंचा खेळण्यास नकार

(Pakistani All Rounder Cricketer Wasim Raja Birthday Today know some special things about wasim raja)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.