न्यूझीलंडकडून पराभवानंतर शोएब अख्तरनंही टीम इंडियाला सुनवलं, म्हणतो ‘मैदानावर क्रिकेट खेळणार की इन्स्टाग्रामवर?’

यंदाचा टी20 विश्वचषक (T20 World Cup) भारतासाठी अतिशय निराशाजनक सुरु आहे. सलग दुसऱ्या सामन्यातही भारतीय खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सनी नमवलं.

न्यूझीलंडकडून पराभवानंतर शोएब अख्तरनंही टीम इंडियाला सुनवलं, म्हणतो 'मैदानावर क्रिकेट खेळणार की इन्स्टाग्रामवर?'
शोएब अख्तर
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 3:16 PM

T20 World Cup 2021 : यंदाच्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) भारताची पराभवाची मालिका सुरुच आहे. आधी पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर आता न्यूझीलंडने 8 विकेट्सनी नमवलं आहे. सलगच्या दुसऱ्या पराभवानंतर सर्वच स्तरातून भारतीय क्रिकेट संघावर टीका होत आहेत. यातच पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही (Shoaib Akhtar) भारतीय क्रिकेटपटूंचा खरपूस समाचार घेत काही सल्ले दिले आहेत.

टीम इंडियाच्या पराभवानंतर शोएबने नाराजी व्यक्त करत भारतीय खेळाडूंना खोचकरित्या ‘तुम्हाला मैदानावर क्रिकेट खेळायचं आहे की इन्स्टाग्रामवर?’ असा सवाल विचारला आहे. मागील काही काळापासून सोशल मीडिया आणि जाहीरातींमध्ये भारतीय क्रिकेटपटू अधिक वेळ घालवत असल्याचे दिसून येत असल्याने त्यावरुनच शोएबने ही टीका केली असावी.

टीम इंडियाचं प्रदर्शन निराशाजनक-शोएब

शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, ‘मी याआधीच सांगितलं होतं की न्यूझीलंड जर नाणेफेक जिंकेल तर भारताच्या अडचणी वाढतील. तसंच झालं आणि संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडूंच प्रदर्शन अतिशय निराशाजनक होतं. मला संपूर्ण सामन्यात असं कधीच वाटलं नाही की भारतीय संघ सामन्यात आहे. सुरुवातीपासूनच ते दबावाखाली दिसत होते. अशा प्रदर्शनामुळे मी खूप दुखी आहे.’

तसंच जी न्यूजशी बोलताना शोएब म्हणाला, ‘मला समजत नाही ते असे कसे खेळू शकतात. तुम्ही टॉस हारलात म्हणजे जीवन संपत नाही. माझ्या मतेतरी नाणेफेक गमावल्यानंतरच टीम इंडियाने हत्यारं टाकली होती. फलंदाजीतही अतिशय खराब शॉट्स खेळले. शमीनेही उशीरा बोलिंग केली. तर शार्दूलने खास प्रदर्शन केलं नाही. त्यामुळे या सर्वानंतरतरी नीट आत्मपरीक्षण करुन सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल आणि विचार करावा लागेल की तुम्हाला मैदानावर क्रिकेट खेळायचंय की इन्स्टाग्रामवर?’.

असा गमावला भारताने सामना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात जिंकणारा संघ निवडत असल्याप्रमाणे गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यावेळी सूर्यकुमारच्या जागी इशान संघात असल्याने सलामीला राहुलसोबत तो आला. पण तो अवघ्या 4 धावा करुन बाद झाला. त्यानंतर मात्र एक-एक करत सर्व फलंदाज तंबूत परतले. संपूर्ण सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा हार्दीक पंड्या (23) आणि रवींद्र जाडेजा (नाबाद 26) यांनीच केल्या. ज्यामुळे भारताचा संपूर्ण डाव अवघ्या 110 धावांवर आटोपला.

यानंतर अवघ्या 111 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी दाखवली. सलामीवीर मार्टीन गप्टीलने 3 चौकार लगावत 20 धावा केल्या. चौथ्या षटकात बुमराहने त्याची विकेट घेतली. ज्यावेळी भारताच्या आशा काहीशा पल्लवीत झाल्या. पण त्यानंतर दुसरा सलमीवीर मिचेलने कर्णधार केनच्या मदतीने धडाकेबाज फलंदाजी केली. मिचेलने 35 चेंडूत 49 धावा केल्या. तर केनने 31 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. तर डेवॉन कॉन्वेने 2 धावांची मदत करत संघाला विजय मिळवून दिला. संपूर्ण सामन्यात बुमराह सोडता भारताच्या गोलंदाजाना खास कामगिरी करता न आल्याने न्यूझीलंडचा संघ 8 विकेट्सनी विजयी झाला.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: 2 पराभवानंतरही भारताची सेमी-फायनलची आशा शिल्लक, वाचा कशी?

लाईव्ह मॅचदरम्यान विराट कोहलीने मारली पलटी, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ज्याचं कौतुक केलं त्याचीच उडवली थट्टा

T20 World Cup 2021 : निवृत्तीआधी असगर अफगाणचा मोठा कारनामा, T20I मध्ये धोनीसह 3 दिग्गजांना पछाडलं

(Pakistani Cricketer Shoaib akhtar slams indian cricket team and asks weather they wanto play on field or on instagram)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.