धोनीने पाकिस्तानी क्रिकेटपटूला दिलं मोठ गिफ्ट, आनंदीत झालेला हॅरीस रौफ म्हणाला….
यूएईमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानी संघाला उपांत्यफेरीपर्यंत पोहोचवण्यात रौफची महत्त्वाची भूमिका होती.
चेन्नई: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन एमएस धोनीने (Ms Dhoni) पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरीस रौफला (Haris Rauf) सुंदर भेट दिली आहे. धोनीने त्याची CSK ची जर्सी रौफला भेट म्हणून दिली आहे. 28 वर्षीय हॅरीस रौफने त्याच्या टि्वटर अकाऊंटवर या जर्सीचे फोटो पोस्ट केले आहेत. दयाळू स्वभाव आणि सदभावनेच्या कृतीने धोनी मन जिंकतो असं या पाकिस्तानी खेळाडूने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. (Pakistans Haris Rauf receives legend MS Dhoni’s CSK shirt)
“ही टी-शर्टची सुंदर भेट देऊन लिजिंड आणि कॅप्टन कुल एमएस धोनीने मला सन्मानित केलं. “7” अजूनही दयाळू स्वभाव आणि सदभावनेच्या कृतीने लोकांची मन जिंकतोय. पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद” असे रौफने त्याच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
हॅरीस रौफ सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तो बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्ससाठी खेळतोय. यूएईमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानी संघाला उपांत्यफेरीपर्यंत पोहोचवण्यात रौफची महत्त्वाची भूमिका होती. पाकिस्तानकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्यामध्ये तो फिरकी गोलंदाज शादाब खानपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर होता. त्याने आठ विकेट घेतल्या.
The legend & capt cool @msdhoni has honored me with this beautiful gift his shirt. The “7” still winning hearts through his kind & goodwill gestures. @russcsk specially Thank you so much for kind support. pic.twitter.com/XYpSNKj2Ia
— Haris Rauf (@HarisRauf14) January 7, 2022
धोनी सुद्धा या टी-20 वर्ल्डकपमध्ये संघाच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये होता. पण पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर सुपर 12 मध्येच भारताचा प्रवास संपला. हॅरीस रौफने हार्दिक पांड्याची विकेट घेतली. सलामीच्या सामन्यात भारताचा 10 विकेटने पराभव झाला.
संबंधित बातम्या:
Ajinkya Rahane: खासदार गौतम गंभीर यांचा मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर कुठला जुना राग आहे? Wasim Jaffer: ‘तुमच्या स्मिथपेक्षा आमच्या सैनीचा अॅव्हरेज जास्त’, वसीम जाफरचं ऑस्ट्रेलियन मीडियाला जोरदार प्रत्युत्तर IND vs SA: पुजारा-रहाणेसाठी अय्यर-विहारीचा बळी देणार, राहुल द्रविडने दिले संकेत
(Pakistans Haris Rauf receives legend MS Dhoni’s CSK shirt)