R Ashwin : आर. आश्विननं केला मोठा खुलासा..; म्हणाला, ‘या’ कारणासाठी आला होता निवृत्तीचा विचार

आर. आश्विन (R Ashwin)... टीम इंडिया(Team India)च्या सध्याच्या गोलंदाजां(Indian Bowlers)मध्ये अव्वल... अश्विन कसोटी बळीं(Test Cricket)च्या बाबतीत अव्वल स्थानावर तर आहे. 3 वर्षांपूर्वी आश्विनला अचानक क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार आला, का त्याचा खुलासा त्यानं केलाय.

R Ashwin : आर. आश्विननं केला मोठा खुलासा..; म्हणाला, 'या' कारणासाठी आला होता निवृत्तीचा विचार
आर. आश्विन
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 12:34 PM

मुंबई : आर आश्विन (R Ashwin)… टीम इंडिया(Team India)च्या सध्याच्या गोलंदाजां(Indian Bowlers)मध्ये अव्वल असलेला एक खेळाडू आहे. अश्विन कसोटी बळीं(Test Cricket)च्या बाबतीत अव्वल स्थानावर तर आहेच. मात्र सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमध्ये जिथं स्पिनर आहेत, तिथं अश्विनची गुणवत्ता उच्च दर्जाची आहे. आता त्यानं व्हाइट बॉल क्रिकेटमध्येही पुनरागमन केलंय. पण, प्रश्न असा आहे, की 3 वर्षांपूर्वी आश्विनला अचानक क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार आला? आम्ही नाही तर खुद्द आश्विननं ‘द क्रिकेट मंथली’ला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलंय. संघ व्यवस्थापनाच्या वृत्तीवर नाराज असल्याचं त्यानं सांगितलं. त्यामुळेच क्रिकेट सोडण्याचा विचार सुरू केला, असा खुलासा त्यानं केलाय.

‘वारंवार करत होते लक्ष्य’ आता संघ व्यवस्थापनानं त्याच्यासोबत नेमकं असं काय केलं होतं, ज्यामुळे त्याच्या मनात असा विचार आला? त्याच्या क्रिकेटवरच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. ते त्याला वारंवार लक्ष्य करत होते, त्यामुळे तो दुखावला जात होता. अश्विनच्या म्हणण्यानुसार, व्यवस्थापनाचा हा भेदभाव 2018 ते 2020पर्यंत सुरू होता. याच दरम्यान आपण क्रिकेटला अलविदा करावं, असा विचार आल्याचं त्यानं सांगितलंय.

‘मला आधार का नाही?’ अश्विन म्हणाला, की 2018 ते 2020 या काळात असे अनेक प्रसंग आले जेव्हा मला वाटले, की मी क्रिकेट सोडावं. मी करत असलेल्या कष्टाचं फळ मिळालं नाही. त्या काळात गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत होतो. पहिल्यांदा असं वाटलं, की त्याच्या आसपासचे लोक आपल्या दुखापतीबद्दल गंभीर नाहीत. दुसरं असं, की जर इतरांना समर्थन मिळत असेल, आधार असेल तर आपल्याला का नाही? संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. तरीही मला तो आधार नाही. मात्र, लोकांनी येऊन मला मदत करावी, असा विचार करणारा मी नाही.

Siddharth Yadav U19 : किराणा दुकान चालवून क्रिकेट शिकवलं, आता 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळणार मुलगा

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक यशस्वी आणि कसोटी विकेट घेणारे भारतीय गोलंदाज, पाहा संपूर्ण यादी…

Fab 4 Cricket : सचिन तेंडुलकरच्या ‘तुझे फॅब 4 कोण?’, या प्रश्नावर विनोद कांबळीचं भन्नाट उत्तर!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.