WTC Final : विराट, पुजारा इतकी बेक्कार फलंदाजी का करत आहेत?; राहुल द्रविड यांनी सांगितलं सर्वात मोठं कारण
भारत पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पराभूत झाला आहे. भारताची टॉप ऑर्डर सपशेल फेल गेल्याने भारताचा पराभव झाला आहे. त्यावर राहुल द्रविड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली : टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसीच्या टुर्नामेंटमध्ये पराभूत झाली आहे. गेल्या दहा वर्षापासून हीच हाराकिरी सुरू आहे. 2013मध्येही भारत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू शकला नाही. त्यानंतर आजपर्यंत भारत आयसीसी टुर्नामेंटमध्ये चषक जिंकण्याची कामगिरी करू शकला नाही. कालही भारताने हाततला सामना गमावला. त्याला कारणीभूत भारताचे चार प्रमुख फलंदाज आहे. त्यातही चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली सपशेल अपयशी ठरल्याने अपयशाचं खापर त्यांच्यावर फोडलं जात आहे. टीम इंडियाचे प्रमुख कोच राहुल द्रविड यांनी या मुद्द्यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. पुजारा आणि विराटसह टॉप चार फलंदाजांनी इतकी वाईट फलंदाजी का केली? यावरही राहुल यांनी उत्तर दिलं आहे.
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरचे फलंदाज अत्यंत जबरदस्त आहेत. त्यांच्यामुळेच भारताने ऑस्ट्रेलियात दोन वेळा कसोटी मालिका जिंकली आहे. मात्र, काही सीरिजमध्ये बॅटिंग कंडिशन्स चांगली नव्हती, असं सांगतानाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी प्रत्येक देश अत्यंत कठिण पिच तयार करत आहे, असं राहुल द्रविड यांनी सांगितलं.
सर्वांचाच सरासरी रेट कमी
केवळ भारतच नाही तर इतर संघातील फलंदाजांचाही सरासरी रेट कमी झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी कठिण पिच तयार केली जात आहे. प्रत्येक ठिकाणी टेस्ट मॅच लवकर संपत आहे, असंही राहुल द्रविड यांनी सांगितलं. राहुल द्रविड यांचं हे विधान आणि कारण अजब आहे. कारण ज्या पिचवर पुजारा आणि विराटसारखे लोक फेल होत आहे, तर दुसरीकडे ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा धावांचा पाऊस पाडत आहेत. त्याच पिचवर स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि जो रूट सुद्धा दमदार कामगिरी करत आहेत. अशावेळी राहुल द्रविड पिचला दोष देत असल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
View this post on Instagram
तीन वर्षापासून खराब कामगिरी
गेल्या तीन वर्षापासून विराट आणि पुजाराची खराब कामगिरी राहिली आहे. टेस्ट फॉर्मेटमध्ये दोघांची सरासरी 30 पेक्षा कमी आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये दोन्ही खेळाडू 17-17 सामने खेळले. दोघांची सरासरी 32 इतकी आहे. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक एक शतक लगावले आहे. याच चॅम्पियनशीपमध्ये जो रूटने 53पेक्षा अधिक सरासरीने 1915 धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजाने 64 हून अधिक सरासरीने 1621 धावा केल्या आहेत. तर लाबुशेन, स्मिथ आणि बाबर आजम यांची सरासरी 50 पेक्षा अधिक राहिली आहे.