IPL 2021 च्या उर्वरीत सामन्यात कशी असेल हैद्राबादची रणनीती?, स्वत: राशीद खानने सांगितला ‘प्लॅन’

इंडियन प्रिमीयर लीग अर्थात IPL ला उद्यापासून (19 सप्टेंबर) सुरुवात होणार आहे. पहिल्या पर्वाप्रमाणेच धमाकेदार सामने दुसऱ्या पर्वातही होणार अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमी करत असतानाच हैद्राबाद संघ कशी रणनीती वापरणार आहे हे समोर आले आहे.

IPL 2021 च्या उर्वरीत सामन्यात कशी असेल हैद्राबादची रणनीती?, स्वत: राशीद खानने सांगितला 'प्लॅन'
सनरायजर्स हैद्राबाद
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 5:17 PM

दुबई: बहुप्रतिक्षित अशा आयपीएलच्या उर्वरीत (IPL 2021) पर्वाला उद्यापासून (19 सप्टेंबर) सुरुवात होत आहे. सर्व संघ विलगीकरणाचा कालावधी संपवून मैदानात सरावासाठी सज्ज झाले आहेत. सध्या प्रत्येक संघ उर्वरीत सामन्यांत यश मिळवून बाद फेऱीत पोहचण्यासाठी अतोनात प्रयत्न करणार आहे. अनेकांनी काही नव्या खेळाडूंना संघात स्थान देत आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान यंदाच्या पर्वात सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या सनरायजर्स हैद्राबाद (SRH) संघाने देखील आपली रणनीती सांगितली आहे. त्यांचा मुख्य खेळाडू राशिद खानने (Rashid Khan) आम्ही प्रत्येक सामना हा अंतिम सामना असल्याप्रमाणेच खेळणार आहोत.’ असे सांगत आपले इरादे स्पष्ट केला आहे.

राशिदने ही माहिती सनरायजर्स हैद्राबाद संघाने त्यांच्या ट्वीटरवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमधून दिली आहे. तो म्हणाला,“आम्ही पर्वातील उर्वरीत सर्व सामन्यांसाठी तयार आहोत. आमची सुरुवात यंदा चांगली झाली नसली तरी शेवट आम्ही नक्कीच चांगला करणार आहोत. आम्ही प्रत्येक सामना अंतिम सामना असल्याप्रमाणे खेळत स्वत: 100 टक्के प्रयत्न करणार आहोत.”

फलंदाजीवर अधिक काम करणार

राशिदने पुढे बोलताना स्वत: गोलंदाजीसह फलंदाजीवरही काम करत असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, “मागील दिड वर्षात मी माझ्या फलंदाजीवर फार काम करत आहे. कारण प्रत्येक सामन्यात अखेरच्या 15 ते 25 धावा अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्या चांगल्या खेळून संघाला गोलंदाजीसह फलंदाजीतही विजय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न कऱणार आहे.”

सनरायजर्स हैद्राबाद संघाचे उर्वरीत आयपीएलमधील सामने –

– 22 सप्टेंबर (बुधवार): हैद्राबाद vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 25 सप्टेंबर (शनिवार): हैद्राबाद vs पंजाब किंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 27 सप्टेंबर (सोमवार): हैद्राबाद vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 30 सप्टेंबर (गुरुवार): हैद्राबाद vs चेन्‍नई सुपरकिंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 03 ऑक्टोबर (रविवार): हैद्राबाद vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 06 ऑक्टोबर (बुधवार): हैद्राबाद vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): हैद्राबाद vs मुंबई इंडियन्स, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी

हे ही वाचा :

IPL मध्ये ‘हे’ आहेत ‘कंजूस’ गोलंदाज, मेडन ओव्हर टाकण्यात सर्वात पुढे, वाचा सविस्तर यादी

IPL च्या इतिहासात सर्वाधिक धावा खाणाऱ्या गोलंदाजांमध्ये दिग्गजांचाही समावेश, ‘ही’ नावं वाचून चकित व्हाल

विराटच्या राजीनाम्यानंतर अनिल कुंबळे पुन्हा मुख्य प्रशिक्षक?, का दिला होता कुंबळेने राजीनामा?

(Rashid khan says sunrisers hyderabad will Play Every Game like its final)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.