IPL 2021: ‘या’ दोन खेळाडूंच्या संघात येण्याने आरसीबीला मोठा फायदा, विराटची ही प्रतिक्रिया नक्की कोणासाठी?

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील उर्वरीत सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या हंगामात उत्तम कामगिरी करणाऱ्या आरसीबी संघाने नव्याने घेतलेल्या दोन खेळाडूंचं कौतुक कर्णधार विराट कोहलीने केले आहे.

IPL 2021: 'या' दोन खेळाडूंच्या संघात येण्याने आरसीबीला मोठा फायदा, विराटची ही प्रतिक्रिया नक्की कोणासाठी?
आरसीबी संघ
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 7:45 PM

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian premier league) 14 व्या सीजनचे उर्वरीत सामने आजपासून (19 सप्टेंबर)  युएईमध्ये सुरु झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाने मोठे बदल करत काही धाकड खेळाडूंना संघात समाविष्ट केलं आहे. यातील दोन बदल हे संघासाठी फार फायदेशीर असल्याचं विराटने सांगितलं दोन खेळाडूंची नावं घेत, त्यांच्या संघात येण्याने संघाचा खेळ आणखी सुधारेल असंही विराटने म्हटलं आहे. हे दोन खेळाडू म्हणजे श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाची डोकेदुखी वाढवणारे वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) आणि दुष्मंथा चमिरा (Dushmantha Chameera).

या दोघांनाही आरसीबीने काही दिवसांपूर्वीच करारबद्ध केलं. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अॅडम झाम्पाच्या (Adam Zampa) जागी हसरंगाला  घेण्यात आलं आहे. हसरंगा भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत मालिकावीर देखील राहिला होता. हसरंगासह श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू यासह दुष्मंथा चमिरा याला केन रिचर्डसनच्या (Kane Richardson) बदली खेळवण्यात येणार आहे. नुकतीच आरसीबीने निळ्या रंगाच्या जर्सीचे उद्घाटन केले. यावेळी विराटने झाम्पा आणि केनला आठवत नव्याने सामिल झालेल्या हसरंगा आणि चमिरा यांच्यामुळे संघाला बराच फायदा होणार असल्याचं विधान केलं. आरसीबीने कोरोना काळात फ्रंटलाईन वर्कर्स वापरत असलेल्या पीपीई किटच्या कलरची म्हणजेच निळी जर्सी ही त्यांना सपोर्ट म्हणून तयार केली आहे. सामन्यानंतर ती विकून मोफत लसीकरणासाठी मदत म्हणून त्याचे पैसे आरसीबी संघ देणार आहे.

कोहलीच्या आरसीबीसाठी यंदाची आयपीएल उत्तम

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत एकही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये विराटचा संघ रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) उत्तम प्रदर्शन करत आहे. त्यांनी उत्तम सुरुवात करत 7 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. यासोबतच ते 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत.

रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाचे उर्वरीत सामने

– 20 सप्टेंबर (सोमवार): आरसीबी vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 24 सप्टेंबर (शुक्रवार): आरसीबी vs चेन्‍नई सुपरकिंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 26 सप्टेंबर (रविवार): आरसीबी vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 29 सप्टेंबर (बुधवार): आरसीबी vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 03 ऑक्टोबर (रविवार): आरसीबी vs पंजाब किंग्‍स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 06 ऑक्टोबर (बुधवार): आरसीबी vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): आरसीबी vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई

हे ही वाचा –

IPL 2021 च्या उर्वरीत सामन्यांसाठी मुंबई इंडियन्स संघात बदल, रणजीमध्ये हॅट्रीक घेणारा धुरंदर अष्टपैलू दाखल

T20 World Cup पूर्वी भारतीय संघ खेळणार दोन सराव सामने, असे असेल वेळापत्रक, BCCI चा मास्टर प्लॅन तयार

IPL च्या इतिहासात सर्वाधिक धावा खाणाऱ्या गोलंदाजांमध्ये दिग्गजांचाही समावेश, ‘ही’ नावं वाचून चकित व्हाल

(RCB captain Virat kohli praises sri lankan players wanindu hasaranga and dushmantha chameera)

अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.