AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs MI, IPL 2022 : मुंबई इंडियन्सची 79 धावांवर सहावी विकेट, भविष्य खडतर

मुंबई इंडियन्सने 13 ओवर 2 बॉलमध्ये 6 विकेट 79 धावा केल्या आहेत. यामुळे आता राहिलेली आशा ही सूर्यकुमार यादव आणि उनाडकट क्रीजवर आहेत.

RCB vs MI, IPL 2022 : मुंबई इंडियन्सची 79 धावांवर सहावी विकेट, भविष्य खडतर
मुंबई इंडियन्सची 79 धावांवर सहावी विकेटImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 09, 2022 | 9:20 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सविरुद्ध (MI) गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्सने 13 ओवर 2 बॉलमध्ये 6 विकेट 79 धावा केल्या आहेत. यामुळे आता राहिलेली आशा ही सूर्यकुमार यादव आणि उनाडकट क्रीजवर आहेत. इशान किशन हा देखील 26 धावा काढून आऊट झाला आहे. त्यामुळे आता सुर्यकुमारकडे सर्वकाही आशा उरल्या आहेत. मुंबईने 50 धावांवर पहिला आणि 62 धावांवर पाचवा गडी गमावला. रोहित शर्मा 26 धावांवर हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर इशान किशन (26) याला आकाश दीपने बाद केले. हसरंगाच्या गोलंदाजीवर डेव्हाल्ड ब्रेविस 8 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. टिळक वर्मा (0) मॅक्सवेलने धावबाद झाला, तर हसरंगाच्या चेंडूवर किरॉन पोलार्ड खाते न उघडता एलबीडब्ल्यू झाला.त्यामुळे मुंबई आता विजयाचे खाते उघडणार की नाही, हाच प्रश्न आहे.

खेळाडूंना काय झालं?

आयपीएलमध्‍ये दुसरा सामना खेळताना बेबी एबी म्हणजे डेवाल्ड ब्रेविसने 11 बॉलमध्ये 8 धावा करून बाद झाला. त्याला वानिंदू हसरंगाने एलबीडब्ल्यू आऊट केले. मागील सामन्यात केकेआरविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने 19 चेंडूत 29 धावा केल्या होत्या. त्यानंतर आला रोहित शर्मा. याने 15 बॉलमध्ये 26 धावा करून बाद झाला. त्याची विकेट हर्षल पटेलच्या खात्यात आली. दोन्ही खेळाडू आयपीएलच्या 6 डावांमध्ये आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये हर्षलने रोहितला तीनदा बाद केले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने पहिल्या 6 षटकात एकही विकेट न गमावता 49 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशनने संघाला वेगवान सुरुवात करून दिली. पॉवर प्लेमध्ये दोन्ही खेळाडूंनी 7 चौकार आणि 1 षटकार ठोकला.

रोहितचा नवा विक्रम

रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी 400 चौकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कोहली आणि सुरेश रैनानंतर आयपीएलमध्ये कोणत्याही एका फ्रँचायझीसाठी 4 हजार 500 धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला तो ठरलाय. त्याने मुंबईसाठी 4 हजार 521 धावा केल्या आहेत. पॉवर प्लेमध्ये इंडियन्सची झटपट सुरुवात आहे.

मुंबई इंडियन्सचे खेळाडू

एमआय : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (डब्ल्यूके), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, रमणदीप सिंग, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह, बासिल थम्पी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

फाफ डू प्लेसिस (क), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

इतर  बातम्या

Special Report | Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ल्यामागे कोण?-tv9

Special Report | Gunaratna Sadavarte यांना 11 एप्रिलपर्यत पोलीस कोठडी-tv9

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने मैदानात उतरताच केला मोठा विक्रम, धोनी आणि रैनाच्या यादीत समावेश

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.