IPL 2022 Retention : मुंबईने 4 तर बँगलोरने 3 खेळाडूंना रिटेन केलं, रोहितला विराटपेक्षा जास्त पैसे
आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने रिटेन करत विराट कोहलीपेक्षा जास्त पैसे दिले आहेत. रोहितला या सीझनसाठी तब्बल 16 कोटी मिळाले आहेत.
मुंबई : आयपीएलच्या रिटेंन्शनबाबत जसजशी माहिती समोर येऊ लागली आहे. तसतसा चाहत्यांचा उत्साह वाढत चालला आहे. कारण त्यांचे फेवरेट खेळाडू कोणत्या टीमकडून खेळणार हे स्पष्ट होऊ लागलं आहे. मुंबई आणि आरसीबीने रिटेन केलेल्या खेळाडुंची नावे समोर आली आहेत. यावेळी खेळाडुंना मिळालेली रक्कम चाहत्यांना आवाक करणारी आहे. कारण यावेळी काही खेळाडुंच्या रकमेत मोठा फरक पडला आहे. यंदाच्या आयपीएलसाठी मुंबईकडून रोहित शर्मा तर आरसीबीकडून विराट कोहलीला रिटेन करण्यात आलं आहे.
रोहित शर्माला विराटपेक्षा जास्त पैसे
आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने रिटेन करत विराट कोहलीपेक्षा जास्त पैसे दिले आहेत. रोहितला या सीझनसाठी तब्बल 16 कोटी मिळाले आहेत. मात्र विराट कोहलीला आरसीबीकडून 15 कोटी रुपयात रिटेन करण्यात आलं आहे. मुंबईकडून दुसरा खेळाडू जसप्रीत बुमराह रिटेन करण्यात आला आहे. त्याला यंदाचं आयपीएल खेळण्यासाठी 12 कोटी रुपये मिळाले आहेत. तर तिसरा खेळाडू सुर्यकुमार यादवचं 8 कोटी रुपयात रिटेंन्शन करण्यात आलं आहे. मुंबईने कायरन पोलार्डचंही 6 कोटी रुपये देऊन रिटेंन्श केलं आहे.
आरसीबीकडून तीन खेळाडू रिटेन
आरसीबीकडून रिटेन करण्यात आलेल्या खेळाडुंमध्ये विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराजचा समावेश आहे. विराट कोहलीला यंदाच्या आयपीएलसाठी 15 कोटी रुपये मिळणार आहेत. तर ग्लेन मॅक्सवेल याला 11 कोटी रुपये मिळणार आहेत. तर तिसरा खेळाडू मोहम्मद सिराजला 7 कोटी रुपये मिळतील. त्याममुळे विराट कोहलीला यंदा पहिल्यांदाच रोहित शर्मापेक्षा कमी पैसे मिळाले आहेत. सर्वात मोठी बोली के. एल. राहुलवर लागण्याची शक्यता आहेत.