AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माच्या खांद्यावर दिसला रहस्यमय तिसरा हात, फोटो झाला व्हायरल

Social media: ट्विटरवर R A T N I S H नावाच्या हँडलवर रोहित शर्मा याचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 2019 मधील आहे. जेव्हा रोहित शर्मा स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे संचालक योगेश पटेल यांना भेटला होता. या छायाचित्रात योगेश पटेल यांनी एक हात रोहित शर्माच्या खांद्यावर तर दुसरा हात पोटावर ठेवला आहे.

रोहित शर्माच्या खांद्यावर दिसला रहस्यमय तिसरा हात, फोटो झाला व्हायरल
rohit sharma
| Updated on: Jul 12, 2024 | 7:58 AM
Share

भारतीय संघाला दुसऱ्यांदा T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली. T20 विश्वचषक जिंकून देणारा भारतीय संघ आणि कर्णधार रोहित शर्मा यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. रोहित शर्मा सध्या माध्यमांपासून सोशल मीडियापर्यंत चर्चेत आहे. सध्या रोहित शर्माच्या एका फोटोने धुमाकूळ माजवला आहे. 2019 मधील त्याच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. खरं तर, हा फोटो पाहिल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटत आहे. कारण रोहित शर्मा एका चाहत्यासोबत दिसत आहे. पण त्याच्या खांद्यावर तिसरा हातही दिसतो आणि ती व्यक्ती दिसत नाही. ज्यानंतर हे चित्र पाहून यूजर्सही हैराण झाले आणि विचारत आहेत की हा रहस्यमयी हात कसा?

2019 मधील फोटो आला चर्चेत

ट्विटरवर R A T N I S H नावाच्या हँडलवर रोहित शर्मा याचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 2019 मधील आहे. जेव्हा रोहित शर्मा स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे संचालक योगेश पटेल यांना भेटला होता. या छायाचित्रात योगेश पटेल यांनी एक हात रोहित शर्माच्या खांद्यावर तर दुसरा हात पोटावर ठेवला आहे. पण दुसऱ्या खांद्यावर तिसरा हातही दिसत आहे. यामुळे हा फोटो पाहून लोकांना प्रश्न पडतो की हा कोणाचा तिसरा हात आहे?

काय म्हणतात युजर

रोहित शर्मा याचा हा फोटो व्हायरल होताच अनेक प्रतिक्रिया सुरु झाल्या आहे. अनेकांनी हा फोटो शेअर केला आहे. पाच लाखांपेक्षा जास्त जणांनी ही पोस्ट पाहिली आहे. युजर आपल्या कॉमेंटमध्ये वेगवेगळे अंदाज लावत आहे. एका युजरने तर हा देवाचा हात आहे, असे म्हटले आहे. दुसऱ्या युजरने हा फोटो एडीट केला असल्याचे म्हटले आहे. सीबीआयकडे हे प्रकरण देण्याची मागणी एका युजरने केली आहे.

एआयचा वापर केल्याचा दावा

Sir BoiesX नावाच्या युजरने वेगळाचा दावा केला आहे. त्याने रोहित शर्मा याचे दोन फोटो ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, एआयचा वापर करुन तिसरा व्यक्ती काढला आहे. परंतु त्यावेळी त्याचा हात काढणे विसरला गेला आहे. त्यावेळी रोहित शर्मा आणि योगेश पटेल याच्यासोबत असणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीचा फोटोही त्याने जोडला आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.