AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Tendulkar Lunch Date Mystery Boy: गोव्याच्या युवा चित्रकारासोबत सारा तेंडुलकर लंच डेटवर? पाहा VIDEO

अर्जुन आणि सारा या सचिनच्या दोन्ही मुलांवर नेहमीच मीडियाची नजर असते. त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात काय चाललय? यावर माध्यमांमध्ये नेहमी बातम्या येत असतात.

Sara Tendulkar Lunch Date Mystery Boy: गोव्याच्या युवा चित्रकारासोबत सारा तेंडुलकर लंच डेटवर? पाहा VIDEO
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 12:43 PM
Share

मुंबई: प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आता क्रिकेटच्या मैदानापासून दूर गेला असला, तरी तो आणि त्याचं कुटुंब नेहमी चर्चेत असतं. अर्जुन आणि सारा या सचिनच्या दोन्ही मुलांवर नेहमीच मीडियाची नजर असते. त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात काय चाललय? यावर माध्यमांमध्ये नेहमी बातम्या येत असतात. आता सचिनची लेक सारा (Sara Tendulkar) मुंबईत एका रेस्टॉरंटमध्ये दुपारच्या लंचसाठी गेली होती. त्यावेळी एक तरुण तिच्यासोबत दिसला. त्यावरुन माध्यमांमध्ये बरीच उलट-सुलट चर्चा सुरु आहे. साराच नाव आधी शुभमन गिलबरोबर (shubman gill) जोडलं जात होतं. सारा मुंबईच्या हक्कासन रेस्टॉरंटमधून बाहेर येत असतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. सारासोबत असलेला तरुणही या व्हिडिओमध्ये दिसतो. दोघे एकत्रच रेस्टॉरंटमधून बाहेर पडले.

सारासोबत दिसलेला मुलगा अर्जुन कपूर? साराने काळ्या रंगाचा वनपीस परिधान केला होता. दोघे बाहेर आले व निळ्या रंगाच्या कारमध्ये जाऊन बसले. त्याचवेळी कॅमरामन्सनी त्यांना गाठून फोटो काढले. सारा तेंडुलकर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात Active असते. ती तिचे वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते. त्यावरुनही युजर्स वेगवेगळे अंदाज बांधत असतात. आता सारासोबत दिसलेला तो मुलगा कोण ? याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

व्हिडिओमध्ये दिसलेल्या मुलाचे लूक अर्जुन कपूरसारखे असल्याने तो अर्जून कपूर असल्याचं काही युजर्सना वाटतं. काहींनी शुभमन गिलचं आता काय होणार? असं गमतीने म्हटलं आहे. सारासोबत दिसलेला तो मुलगा गोव्याचा युवा चित्रकार सिद्धार्थ केरकर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. डिसेंबर महिन्यात सारा गोव्यामध्ये गेली होती.

साराचा गोव्यातील फोटो व्हायरल सारा तेंडुलकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते. तिने हातात गुलाबाचे एक फूल पकडले आहे. या फोटोमध्ये सारा खूपच सुंदर दिसतेय. तिने काळ्या रंगाचा गॉगल लावला असून तिच्या गळ्यात एक चैन आहे. या फोटोमध्ये साराच्या चेहऱ्यावर गोड हसू आहे. साराच्या या फोटोवर तिची मैत्रीण कनिका कपूरनेही कमेंट केली आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.