धोनीच्या वाढदिवशी पत्नी साक्षीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष; नेटकरी म्हणाले ‘पतीव्रता..’

महेंद्रसिंह धोनीने वाढदिवसाचा केक कापला आणि त्यानंतर त्याची पत्नी साक्षी धोनीच्या एका कृतीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. खुद्द साक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

धोनीच्या वाढदिवशी पत्नी साक्षीच्या 'त्या' कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष; नेटकरी म्हणाले 'पतीव्रता..'
MS Dhoni and Sakshi DhoniImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 10:57 AM

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेट विश्वातील सर्वांत प्रतिष्ठित नावांपैकी एक महेंद्रसिंह धोनी आज 7 जुलै रोजी त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करतोय. सोशल मीडियाद्वारे ‘थाला’वर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. महेंद्रसिंह धोनीने मध्यरात्री केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी साक्षी धोनीसुद्धा उपस्थित होती. धोनीने केक कापल्यानंतर साक्षीने केलेल्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलंय. साक्षीने तिचा पतीव्रतेचा धर्म पाळत धोनीच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. या सेलिब्रेशनदरम्यान अभिनेता सलमान खानसुद्धा तिथे उपस्थित होता. धोनीने सलमानलाही वाढदिवसाचा केक भरवला.

साक्षीने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये माही केक कापल्यानंतर त्याचा तुकडा सर्वांत आधी पत्नी साक्षीला भरवतो. त्यानंतर साक्षीसुद्धा महेंद्रसिंहला केक भरवते आणि त्याच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेते. यावेळी माहीसुद्धा तिला आशीर्वाद देताना दिसतोय. या दोघांच्या केमिस्ट्रीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. साक्षीच्या या कृतीवरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलमान खाननेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धोनीचा केक कापतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

धोनीच्या वाढदिवसानिमित्त आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. धोनीच्या आयुष्यावर आधारित ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट जुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने धोनीची भूमिका साकारली होती. याशिवाय कियारा अडवाणी आणि दिशा पटानी यासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत होत्या. वाढदिवसाच्या एक दिवस आधी महेंद्रसिंह धोनी त्याच्या पत्नीसोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात पोहोचला होता. यावेळी दोघांनी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले.

साक्षी आणि महेंद्रसिंह हे बालपणीचे मित्र आहेत. त्यांचे वडील एकत्र काम करत होते. मात्र काही काळानंतर साक्षी तिच्या कुटुंबीयांसोबत देहरादूनला राहायला गेली. त्यानंतर दोघांचा संपर्क तुटला. पण नशिबाचा खेळ पाहा, धोनी आणि साक्षी अनेक वर्षांनंतर पुन्हा भेटले. टीम इंडिया 2007 मध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तिथे साक्षी इंटर्नशिप करत होती. यादरम्यान तिची भेट धोनीशी पुन्हा झाली आणि तिथूनच या दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. 4 जुलै 2010 रोजी या दोघांनी लग्न केलं.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.