Indian squad for Test & T 20 Series IND vs SL: सीरीजसाठी संघात मोठ बदल, कोण इन? कोण आऊट? जाणून घ्या सर्व डिटेल्स

भारताच्या सिनियर निवड समितीने आगामी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. त्यांनी आधी रोहित शर्माची कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड केली.

Indian squad for Test & T 20 Series IND vs SL: सीरीजसाठी संघात मोठ बदल, कोण इन? कोण आऊट? जाणून घ्या सर्व डिटेल्स
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 7:15 PM

मुंबई: भारताच्या सिनियर निवड समितीने आगामी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी (India vs Srilanka Series) कसोटी आणि टी-20 संघ (Test & T-20 Team) जाहीर केला आहे. आधी रोहित शर्माची कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला. पेटीएम T 20 आणि कसोटी मालिकेसाठी निवड समितीने 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. लखनऊ आणि धर्मशाळा येथे तीन टी-20 आणि मोहाली-बंगळुरुमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा यांना कसोटी संघात स्थान मिळणार नाही, अशी मागच्या काही दिवसांपासून चर्चा होती. ती अखेर खरी ठरली आहे. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा दोघांना निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघातून डच्चू दिला आहे. अजिंक्यने नुकतचं सौराष्ट्रविरुद्ध रणजीमध्ये शानदार शतक ठोकलं होतं. त्याने श्रीलंका दौऱ्यासाठी आपली दावेदारी सांगितली होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. निवड समितीने संघ निवड करताना रहाणे आणि पुजारा दोघांना बाहेरच ठेवलं.

मागच्या महिन्यात संपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दोघांनी खूपच खराब प्रदर्शन केलं होतं. त्यांना अनेक संधी मिळाल्या पण त्यांना त्याचा फायदा उचलता आला नाही. अखेर निवड समितीने त्यांना डच्चू दिला आहे.

मागच्या महिन्यात संपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दोघांनी खूपच खराब प्रदर्शन केलं होतं. त्यांना अनेक संधी मिळाल्या पण त्यांना त्याचा फायदा उचलता आला नाही. अखेर निवड समितीने त्यांना डच्चू दिला आहे. चेतेश्वर पुजाराचा अजूनही खराब फॉर्म कायम आहे. आज मुंबई विरुद्ध तो शुन्यावर बाद झाला.

संघातून कोण बाहेर गेलं?

चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, ऋद्धिमान साहा संघातून बाहेर

फिटनेसमुळे केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर दोघांचा श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही.

वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजसाठी आराम देण्यात आला आहे. शार्दुल टेस्ट आणि टी-20 दोन्ही संघांमध्ये नसणार आहे.

संघात कोणाचा समावेश?

श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह विश्रांती घेऊन संघात परतला आहे, तर जाडेजाने त्याच्या दुखापतीवर मात केली आहे.

कुलदीप यादवने एकवर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. यापूर्वी जानेवारी 2021 मध्ये कुलदीप भारताच्या कसोटी संघाचा भाग होता.

संजू सॅमसन पुन्हा एकदा भारतीय संघात परतला आहे. त्याला टी 20 संघात स्थान मिळाले आहे. तो 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा हिस्सा होता. नवीन चेहरा

सौरभ कुमारच्या रुपात भारतीय संघात नवीन चेहरा आला आहे. हा उत्तर प्रदेशचा खेळाडू आहे. तो डावखुरा फिरकी गोलंदाज आहे.

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.