शिखर धनवसोबत घटस्फोट, आयशा मुखर्जी म्हणते, मी अजून कणखर झालीय, वाचा सविस्तर तिनं आणखी काय म्हटलंय?

भारतीय क्रिकेटमधील गब्बर अर्थात सलामीवीर शिखर धवन पत्नी आयेशा मुखर्जीसोबत घटस्फोट घेत आहे. दोघेही आठ वर्षांनंतर वेगळे होत आहेत.

शिखर धनवसोबत घटस्फोट, आयशा मुखर्जी म्हणते, मी अजून कणखर झालीय, वाचा सविस्तर तिनं आणखी काय म्हटलंय?
शिखर धवन पत्नीसोबत
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 3:05 PM

मुंबई : ‘घटस्फोट’ ऐकायलाच कठीण असणाऱ्या या शब्दातच स्फोट आहे. ज्यामुळे अशा कठीण शब्दाप्रमाणे तो प्रसंगही तितकाच कठीण असणार यात शंका नाही. याच कठीण प्रसंगातून सध्या भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी (Aesha Mukerji) हे दोघेही जात आहेत. नुकतंच आयशाने एक इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या आणि शिखरच्या (Shikhar Dhawan Divorce) घटस्फोटाबद्दल माहिती दिली. शिखरच्या बाजूने अद्याप या संदर्भात कोणतेही अधिकृत स्टेटमेंट आले नसले तरी या पोस्टने सर्वत्र खळबळ माजली आहे.

कोणत्याही महिला किंवा पुरुषासाठी घटस्फोट हा प्रसंग फारच अवघड जात असणार यात शंका नाही. त्यात आयशाच्या जीवनात हा वाईट प्रसंग दुसऱ्यांदा येत असल्याने तिच्यासाठी हे सारं अधिकच अवघड जात असणार. किक बॉक्सर असणारी आयशा कुटुंबासोबत 8 वर्षांची असताना ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली होती. शिखर आणि आयशाची ओळख सोशल मीडियावर झाली होती. त्यानंतर दोघांनी 2012 साली लग्न केलं. त्यांना जोरावर नावाचा एक मुलगाही आहे. पण आयशाचं याआधीही एक लग्न झालं होतं. विशेष म्हणजे शिखरपेक्षा ती 10 वर्षांनी मोठी असून तिला दोन मुलीही आहेत. असं सर्व असतानाही दोघांनी समजूतीने लग्न करत 9 वर्ष संसार केला. अनेकदा शिखरच्या इन्स्टाग्रामवर आयशा आणि मुलाचे व्हिडीओ, फोटो असं सारं काही असायचं. पण या सर्व सुखावर विरजण आलं आणि आता दोघेही वेगळे होत आहेत.

2020 मध्ये वादाला सुरुवात

आयशा आणि शिखर यांच्या नात्यात 2020 मध्ये तणाव निर्माण झाला असल्याचा बातम्या समोर आल्या होत्या. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. यासोबतच आयेशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शिखरचे फोटो काढून टाकले होते. त्यानंतर आता इन्स्टाग्रामवरच आयशाने घटस्फोटाची पोस्ट लिहित ही सर्व माहिती दिली आहे.

घटस्फोट शब्दाचा अर्थ आता कळाला…

‘एकदा घटस्फोट घेतल्यानंतर असे वाटले की दुसऱ्यांदा बरेच काही धोक्यात आले आहे. मला बरेच काही सिद्ध करायचे होते. मात्र जेव्हा माझे दुसरे लग्न मोडले तेव्हा ते खूप भीतीदायक होते. मला वाटले की घटस्फोट हा एक घाणेरडा शब्द आहे, पण मी दोनदा घटस्फोट घेतला. शब्दांचे किती शक्तिशाली अर्थ आणि कनेक्शन असू शकतात हे मजेदार आहे. घटस्फोटित म्हणून मला स्वतःला हे समजले आहे. ‘

View this post on Instagram

A post shared by Aesha Mukerji (@apwithaesha)

मला वाटले मी देवाचाही अपमान करतेय

आयेशाने पुढे म्हटले आहे की, “जेव्हा मी पहिल्यांदा घटस्फोट घेतला तेव्हा मी खूप घाबरले होते. मला असे वाटले की मी आयुष्यात अयशस्वी झाले आहे आणि त्यावेळी मी खूप चुकीचे करत आहे असे वाटत होते. मला वाटले की मी सर्वांना निराश केले आहे आणि स्वार्थी देखील आहे. मला वाटले की, मी माझ्या पालकांना निराश करत आहे. मी माझ्या मुलांचा अपमान करत आहे आणि काही प्रमाणात मला असे वाटले की मी देवाचाही अपमान करतेय.”

या सर्वाचा अर्थ काय?

आयशाने पोस्टमध्ये लिहिलं की, “घटस्फोट हा एक अतिशय घाणेरडा शब्द होता. म्हणूनच हे माझ्यासोबत पुन्हा घडले आहे. ते भयंकर होते. एकदा घटस्फोट घेतल्यानंतर, दुसऱ्यांदा मला असे वाटले की माझ्याकडे बरेच काही आहे. मला बरेच काही सिद्ध करायचे होते. म्हणून जेव्हा माझे दुसरे लग्न मोडले तेव्हा ते खूप वाईट होते. मी पहिल्यांदा ज्या भावनांमधून गेले होते ते पुन्हा परत आले. शंभर पट भीती, अपयश आणि निराशा. याचा अर्थ काय?”

इतर बातम्या

PHOTO : शिखर धवनच नाही, ‘या’ भारतीय क्रिकेटपटूंनीही घेतला आहे घटस्फोट

‘सर जाडेजा’चा नवा विक्रम, इंग्लंडच्या भूमीत नवा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय अष्टपैलू

(Shikhar Dhawan Divorces with wife Aesha Mukerji see what aaesha saying in instagram post)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.