मोठ्या वादात अडकला शोएब अख्तर, अचानक टीव्ही शो सोडणं पडलं महागात, चॅनेलने ठोकला 100 मिलीयनचा दावा
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि पाकिस्तानच्या पीटीव्ही चॅनेलचा अँकर नियाज यांच्यात वाद झाला होता. जो वाद शोएबला चांगलाच महाग पडत आहे.
कराची: पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि तेथील पीटीव्ही चॅनेचा अँकर नोमान नियाज (Noamn Niyaz) यांच्या चालू शोमध्ये थोडा वाद झाला होता. जो वाद आतामात्र वेगळ्याच स्तरावर पोहचला असून अख्तरला अडचणीचा सामना करावा लागत आहे. समोर येणाऱ्या माहितीनुसार नुकताच चॅनेलने अख्तरला 100 मिलियनची मानहानीची नोटीस पाठवली आहे. अख्तरने चालू शोमध्ये कॉन्ट्रॅक्ट संपण्यापूर्वीच राजीनामा दिला आणि हे चॅनेलच्या नियमांचं उल्लंघन असल्याचं सांगत चॅनेलने ही कारवाई केली आहे.
एएनआयच्या रिपोर्टनुसार, नॅशनल टेलीव्हीजन अॅमिनिस्ट्रेशनने नोटिसमध्ये लिहिलं आहे की,“कॉन्ट्रॅक्टच्या नियांमाप्रमाणे तीन महिन्याची नोटिस दिल्याशिवाय चॅनेल किंवा तिथे काम करणारा एकमेंकापासून वेगळे होऊ शकत नाहीत. अख्तरने 26 ऑक्टोबर रोजी चालू शोमध्ये राजीनामा दिला ज्यामुळे पीटीव्ही चॅनेलचं मोठं नुकसान झालं आहे.”
अख्तरवर 100 मिलीयनचा मानहाणीचा दावा
या रिपोर्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, “अख्तरने टी20 विश्वचषकादरम्यान अचानाक दुबई सोडली. त्याने पीटीव्ही मॅनेजमेंटला कोणतीच माहिती दिली नाही. उलट हरभजन सिंगसोबत तो भारताच्या एका टीव्ही शोमध्ये दिसून आला. यामुळेही पीटीव्हीतं नुकसान झालं आहे.” दरम्यान या सर्वामुळे चॅनेलने अख्तरवर मानहाणीचा दावा करत 100 मिलियन डॉलर्सची मागणी केली आहे. भारतीय चलणानुसार ही रक्कम 33,33,000 इतके होते.
काय आहे नेमकं प्रकरण?
अख्तर हा पीटीव्हीच्या एका शोमध्ये चर्चेत सहभागी होता. पीटीव्हीचा ‘गेम ऑन है’ असं या शोचं नाव असून यावेळी चर्चेदरम्यान अख्तरने पाकिस्तानचे गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस राउफ यांचं कौतुक केलं. यावेळी पाकिस्तान सुपर लीगच्या लाहौर कलंदर्स संघातून हे दोघे समोर आले आहेत असं अख्तर म्हणाला. त्यावेळी शोचा अँकर नियाज याने अख्तरला टोकत, ‘शाहीन पाकिस्तानच्या अंडर-19 टीममध्येही असल्याचं आठवून दिलं.’ यावेळी शोएब , ‘मी हारिस राउफपबद्दल बोलतोय’ असं म्हणाला. पण अख्तरचा हा बोलतानाचा अंदाज नियाजला न आवडल्याने दोघांमध्ये वाद झाला. ज्यावेळी नियाजने, अख्तरला चांगलेच सुनावले. तसंच असं ओव्हरस्मार्ट वागणार असाल तर तुम्ही शोमधून जाऊ शकता असंही म्हणाला.
इतर बातम्या
(Shoaib akhtar and anchor nauman niyaz controversy PTV issues 100 million defamation notice to akthar)