Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shreyas Iyer Injury Update : श्रेयस अय्यर याच्या इंजेक्शनने टेन्शन वाढवलं; आशिया चषकाआधीच वाईट बातमी

टीम इंडियातील महत्त्वाचा खेळाडू श्रेयस अय्यर दुखापतीनेग्रस्त आहे. पाठीची सर्जरी झाल्यानंतरही त्याला असह्य वेदना होत आहेत. त्यामुळे श्रेयस त्रस्त आहे. पाठीच्या दुखण्यामुळे त्याचे टीम इंडियातील पुनरागमन लांबण्याची शक्यता आहे.

Shreyas Iyer Injury Update : श्रेयस अय्यर याच्या इंजेक्शनने टेन्शन वाढवलं; आशिया चषकाआधीच वाईट बातमी
जसप्रीत बुमराहनंतर मधल्या फळातील महत्त्वाचा खेळाडू श्रेयस अय्यरने नेटमध्ये सराव सुरू केला आहे. पाठीच्या दुखापतीशीही तो बराचवेळ संघाच्या बाहेर आहे. या दुखापतीमुळे अय्यरला आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट फायनलसाठी मुकला होता. Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 7:41 AM

नवी दिल्ली : दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरबाबतची एक बातमी आहे. श्रेयसला देण्यात आलेल्या इंजेक्शनने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे आशिया चषक 2023मध्ये श्रेयस खेळेल की नाही? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच श्रेयसला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पाठीला मार लागला होता. त्यानंतर त्याच्यावर सर्जरी झाली होती. मार लागल्यामुळे श्रेयस आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही खेळू शकला नव्हता.

अय्यर सध्या बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्याला पाठीच्या दुखण्याचा अजूनही त्रास जाणवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाठीत प्रचंड वेदना होत असल्याने त्याने इंजेक्शन घेतलं होतं. त्यानंतरही त्याच्या पाठीत अजूनही वेदना होत आहेत. एप्रिलमध्येच लंडनमध्ये त्याची सर्जरी झाली होती. सर्जरी पूर्वी तो भारतीय संघात होता.

हे सुद्धा वाचा

इंजेक्शन सुरूच

श्रेयस अय्यरच्या पाठीच्या वेदना काही कमी होताना दिसत नाही. सर्जरी होऊनही त्याला वेदना जाणवत आहेत. या असह्य वेदनांपासून दिलासा मिळावा म्हणून त्याला इंजेक्शन घ्यावे लागत आहेत. त्यानंतरच त्याला वेदनांपासून थोडा आराम मिळतो. अशा परिस्थितीत त्याला वेदनाशामक इंजेक्शन घेऊन मैदानात उतरवणं धोक्याचं ठरू शकतं. जेव्हा त्याच्या पाठीच्या वेदना बंद होतील आणि इंजेक्शन घेणं पूर्णपणे थांबेल त्यानंतरच त्याचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे. पण याला किती काळ लागेल हे काहीच सांगता येत नाहीये. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

तीन महिन्याहून अधिक काळ

दुखापतीमुळे त्याचा वेस्ट इंडिजच्या संघातही समावेश करण्यात आला नाही. त्याला मॅच फिटनेससाठी अजून तीन महिन्याहून अधिक काळ लागणार आहे. म्हणजे केवळ आशिया कपच नाही तर तो वर्ल्ड कपलाही मुकू शकतो अशी शक्यता आहे. आशिया कप 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरपर्यंत खेळला जाणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही देश वर्ल्ड कप होस्ट करणार आहेत.

दोन्ही चषक खेळण्याची शक्यता कमी

आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये खेळला जाणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये वर्ल्ड कप होणार आहे. त्यापूर्वी आशिया कप हा सर्वात मोठा इव्हेंट असणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीनेच आशिया कपची सर्वच संघाकडून तयारी केली जात आहे. अशावेळी श्रेयस अय्यर या दोन्ही कपमध्ये खेळण्याची शक्यता फार कमी आहे. दुसरीकडे जसप्रीत बुमराह संघात परतण्याच्या तयारीत आहे. आयरलंड विरुद्धच्या सामन्यातून बुमराह टीम इंडियात पुनरागमन करण्याती शक्यता आहे.

'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.