Team india : टीम इंडिया 9 वर्षांचा दुष्काळ लवकरच संपवणार, या दिग्गजाने केली मोठी भविष्यवाणी
गेल्या अनेक वर्षांपासून भारताला आयसीसी ट्रॉफीची अपेक्षा आहे. पुढील 9 वर्षात अनेक आयसीसी स्पर्धा आहेत, त्यात टीम इंडिया भारताला नक्की ट्रॉफी जिंकून देईल असा विश्वास सौरव गांगुली यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : भारतीय टीम 9 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ लवकरच संपवेल अशी प्रतिक्रिया बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारताला आयसीसी ट्रॉफीची अपेक्षा आहे. पुढील 9 वर्षात अनेक आयसीसी स्पर्धा आहेत, त्यात टीम इंडिया भारताला नक्की ट्रॉफी जिंकून देईल असा विश्वास सौरव गांगुली यांनी व्यक्त केला आहे.
2013 ला शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली
गेल्या काही वर्षात भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा वाढला आहे. भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली आहे, मात्र भारताने शेवटची आयसीसी ट्रॉपी 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रुपाने जिंकली होती. त्यानंतर भारताला कोणतेही मोठे इव्हेंटचे विजेतेपद मिळवता आले नाही. त्यामुळे आता भारताला 2022 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या विजेतेपदाचे वेध लागले आहे. ट्रॉफी जिंकून देणारा लिडर अशी रोहित शर्माची ओळख आहे, आणि त्याच्याकडे टीमचे नेतृत्व आहे. त्यामुळे किमान त्याच्या नेतृत्वात तरी भारताचा हा दुष्काळ संपेल अशी अशा क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.
द्रविड-रोहितच्या जोडगोळीवर गांगुलींना विश्वास
भारतीय टीममध्ये सध्या मोठे फेरबदल झाले आहेत. टी-20 आणि वनडेचा कर्णधार म्हणून रोहित शर्माला नियुक्त करण्यात आले आहे, टीमचा मुख्य कोच म्हणून राहुल द्रविडची निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविडची कोच म्हणूनही कामिगीरीही चांगली राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात आता टीमला नवी दिशा मिळेल, तसेच रोहित शर्माचा आधीचा अनुभव भारताला चांगले यश मिळवून देईल अशी अपेक्षा सौरव गांगुली आणि क्रिकेट चाहत्यांना आहे. या दोघांच्या नेतृत्वात टीम हा ट्रॉफीचा दुष्काळ कधी संपवते? हे येणारा काळच सांगेल.