AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

South Africa vs India 2nd Test: उद्या पाऊस खेळ बिघडवणार? काय आहे जोहान्सबर्गचा वेदर रिपोर्ट

वाँडर्सचा रेकॉर्ड पाहिला, तर हे स्टेडियम भारताला फलदायी ठरले आहे. या स्टेडियमवर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांपैकी भारताने दोन कसोटी जिंकल्या आहेत, तर तीन सामने ड्रॉ केलेत.

South Africa vs India 2nd Test: उद्या पाऊस खेळ बिघडवणार? काय आहे जोहान्सबर्गचा वेदर रिपोर्ट
File photo
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 3:32 PM
Share

जोहान्सबर्ग: उद्या जोहान्सबर्गच्या (Johannesburg weather) न्यू वाँडर्स स्टेडियमवर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. त्यावेळी ऐतिहासिक मालिका विजय मिळवण्याचे टीमचे लक्ष्य असेल. एक गोष्ट विसरुन चालणार नाही, याच वाँडर्स स्टेडियमवरुन वर्ष 2018 पासून परदेशातील भारताच्या कसोटी सामन्यामधील विजयाला आरंभ झाला होता. वाँडर्सचा रेकॉर्ड पाहिला, तर हे स्टेडियम भारताला फलदायी ठरले आहे. या स्टेडियमवर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांपैकी भारताने दोन कसोटी जिंकल्या आहेत, तर तीन सामने ड्रॉ केलेत. (South Africa vs India 2nd Test Will rain wash out opening day? Here’s Johannesburg weather forecast)

इथे दक्षिण आफ्रिका भारताला पराभूत करु शकलेली नाही यजमान संघाला आतापर्यंत या मैदानावर भारताला पराभूत करता आलेले नाही. या कसोटीत विजय मिळवून मालिका बरोबरीत आणण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न असेल. दक्षिण आफ्रिकन संघाला विकेटकिपर फलंदाज क्विंटन डि कॉकच्या जागी दुसरा खेळाडू निवडावा लागणार आहे. कारण सेंच्युरियनमधील पराभवानंतर डि कॉकने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली होती. डि कॉक उत्तम फलंदाज सुद्धा आहे. त्यामुळे डि कॉकच्या जागी त्याच तोडीचा खेळाडू सापडणं, सध्याच्या घडीला अवघड आहे.

जोहान्सबर्गचं वातावरण कसं असेल? पहिल्या सेंच्युरियन कसोटीत दुसऱ्या दिवसाचा संपूर्ण खेळ पावसामुळे वाया गेला होता. पहिल्या कसोटीप्रमाणे जोहान्सबर्ग कसोटीवरही पावसाचे सावट असेल. दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाऊस खेळ बिघडवू शकतो. नववर्षाच्या पहिल्या दिवशी जोहान्सबर्गमध्ये पाऊस झाला होता. उद्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी सुद्धा पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यूके मेट ऑफिसच्या अंदाजानुसार, सोमवारी दुपारी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दुपारी लंचनंतरच सत्र पावसामुळे वाया जाऊ शकते. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सुद्धा पावसाचा अंदाज आहे. सेंच्युरियन कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसाने खराब केला होता. जोहान्सबर्ग कसोटीत संपूर्ण दुसरा दिवस पाऊस कोसळेल असे हवामान विभागाचे भाकीत आहे.

संबंधित बातम्या:

Health Care : मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ 5 गोष्टींपासून दूर राहा, वाचा अत्यंत महत्वाची माहीती! मुस्लीम महिलांच्या फोटोवर त्यांची किंमत, महिला आयोगाने घेतली गंभीर दखल, ‘सुल्ली डील’ नेमका प्रकार काय ? पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा, सरकारच्या ताफ्यातील वाहनं इलेक्ट्रीक असणार

(South Africa vs India 2nd Test Will rain wash out opening day? Here’s Johannesburg weather forecast)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.