IND vs SA: ‘घाबरुन जाण्याची गरज नाही’, दुसऱ्या टेस्टआधी दक्षिण आफ्रिकन कर्णधाराचं वक्तव्य

"आमच्याकडे अनेक सक्षम खेळाडू आहेत. त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता असली, तरी त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल"

IND vs SA: 'घाबरुन जाण्याची गरज नाही', दुसऱ्या टेस्टआधी दक्षिण आफ्रिकन कर्णधाराचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 8:08 PM

जोहान्सबर्ग: आमच्या फलंदाजांना अधिक जबाबदारी घेऊन फलंदाजी करावी लागेल, असं दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने म्हटलं आहे. सेंच्युरियनवरील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव झाला होता. दुसरी कसोटीही आफ्रिकेने गमावली, तर मायदेशात प्रथमच ते भारताकडून पराभूत होतील. (South Africa vs India No need for panic but our batsmen need to step up says Test skipper Dean Elgar)

‘आम्हाला घाबरुन जाण्याची गरज नाही’ असं एल्गर रविवारी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हणाला. “आमच्याकडे अनेक सक्षम खेळाडू आहेत. त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता असली, तरी त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल” असे डीन एल्गरने म्हटलं आहे. “एखाद-दुसऱ्या डावात खराब फलंदाजी केली म्हणून ते वाईट क्रिकेटपटू होत नाहीत. कसोटी क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी त्यांच्या पाठिशी उभं राहणं आवश्यक आहे. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या कसोटी संघाची बांधणी करुन पुढे नेऊ शकता” असं डीन एल्गरने म्हटलं आहे.

फलंदाजी आणि गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल, त्याबद्दल आम्ही बोललो आहोत, असे एल्गरने सांगितले. क्विंटन डि कॉकच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळेही धक्का बसल्याचे एल्गरने मान्य केले. सेंच्युरियन कसोटीत पराभूत झाल्यानंतर डि कॉकने राजीनाम्याची घोषणा केली. “मला धक्का बसला. मी क्विंटनसोबत बोलल्यानंतर त्याने मला निर्णयामागची त्याची बाजू समजावून सांगितली. मी त्याच्या निर्णयाचा आदर करतो” असे एल्गर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हणाला.

संबंधित बातम्या: 

Mumbai corona update : मुंबईत आजही कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ, तब्बल 8 हजार 63 नवे रुग्ण Video : भाजप आमदाराकडून अजितदादांचं तोंडभरुन कौतुक, मग दत्तामामांची थेट ऑफर! Maharashtra Corona update : राज्यातला आजचा कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या जवळ, 11 हजार 877 नवे रुग्ण

(South Africa vs India No need for panic but our batsmen need to step up says Test skipper Dean Elgar)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.