‘आता फक्त एकच…’, अजिंक्य रहाणेच्या टेस्ट करीअरबद्दल गावस्करांच मोठं विधान

जोहान्सबर्गमधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पुजारा आणि रहाणे वेगवान गोलंदाज डुआन ओलिवरच्या गोलंदाजीवर लागोपाठच्या चेंडूवर बाद झाले.

'आता फक्त एकच...', अजिंक्य रहाणेच्या टेस्ट करीअरबद्दल गावस्करांच मोठं विधान
Ajinkya Rahane
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 7:29 PM

डरबन: जोहान्सबर्ग येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा डाव अडचणीत सापडला आहे. एकही फलंदाज अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही. विराट कोहली खेळत नसल्यामुळे सर्वांच लक्ष लागलं होतं, ते चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणेकडे. (Ajinkya Rahane) पण दोघांनी निराशा केली. अजिंक्य रहाणे तर आज भोपळाही फोडू शकला नाही. पुजाराने फक्त 3 धावा केल्या. दोघांचाही खराब फॉर्म कायम आहे. (South Africa vs India Rahane Pujara have just the next innings to save their Test careers Sunil Gavaskar)

लागोपाठच्या चेंडूवर बाद

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेकडे कसोटीमधील करीअर वाचवण्यासाठी आता फक्त एक डाव उरला आहे. जोहान्सबर्गमधील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पुजारा आणि रहाणे वेगवान गोलंदाज डुआन ओलिवरच्या गोलंदाजीवर लागोपाठच्या चेंडूवर बाद झाले. जवळपास तीन वर्षानंतर ओलिवरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने उसळत्या चेंडूवर आधी चेतेश्वर पुजाराला बाद केलं. पूजारा बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू पाँईटला उभ्या असलेल्या टेंबा बावुमाच्या हाती विसावला.

फक्त एक डाव उरला आहे

त्यानंतर त्याने रहाणेला बाद केले. पुजाराने 33 चेंडूत फक्त तीन धावा केल्या. रहाणे गोल्डन डकवर बाद झाला. दोघे ज्या पद्धतीने बाद झाले, त्यानंतर गावस्कर यांनी कॉमेंट्री करताना कसोटी करीअर वाचवण्यासाठी रहाणे आणि पुजाराकडे आता फक्त एक डाव उरला आहे, असे विधान केले. “आता दोघांच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्न विचारले जातील. आता त्यांच्याकडे फक्त एक डाव उरला आहे. त्यात काही करु शकले, तरच संघात स्थान टिकवू शकतील” असे गावस्कर म्हणाले.

संबंधित बातम्या:

आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव, उद्या तातडीच्या सुनावणीची शक्यता Photo : खासदार सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून 12 दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा ठाण्यात दहावी, बारावीचे वर्ग सुरू राहणार, शाळांबाबत नवी नियमावली काय? वाचा सविस्तर

(South Africa vs India Rahane Pujara have just the next innings to save their Test careers Sunil Gavaskar)

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.