‘खेळापेक्षा कोणी मोठा नाही’, क्रीडा मंत्री ठाकूर यांचं विराट-रोहित वादावर स्पष्ट मत

या दोन्ही आघाडीच्या खेळाडूंमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, रोहितची वनडे कर्णधारपदी निवड झाल्यामुळे विराट कोहली नाराज असल्याची निव्वळ अफवा आहे. असं काही नाहीय.

'खेळापेक्षा कोणी मोठा नाही', क्रीडा मंत्री ठाकूर यांचं विराट-रोहित वादावर स्पष्ट मत
anurag thakur
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 12:31 PM

नवी दिल्ली: रोहित शर्मा (Rohit sharma) आणि विराट कोहली (Virat kohli) या दोन भारतीय कर्णधारांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याची चर्चा माध्यमं आणि सोशल मीडियावर सुरु आहे. या कथित वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी आपलं मत मांडलं आहे. “खेळापेक्षा कोणी मोठा नाही. संबंधित क्रीडा संघटनेने या बद्दल माहिती दिली पाहिजे” असं क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.

खेळ सर्वोच्च आहे

“खेळ सर्वोच्च आहे आणि खेळापेक्षा कोणी मोठा नाही. काय सुरु आहे? कुठला खेळाडू कुठल्या खेळात आहे, या बद्दल मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. संबंधित फेडरेशन आणि संघटनेचं हे काम आहे. त्यांनी माहिती दिली, तर चांगलं होईल” असं अनुराग ठाकूर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले.

मागच्या आठवड्यात भारताच्या वनडे संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर विराट कोहलीने आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून ब्रेक मागितला. तेव्हापासून भारताच्या या दोन्ही आघाडीच्या खेळाडूंमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, रोहितची वनडे कर्णधारपदी निवड झाल्यामुळे विराट कोहली नाराज असल्याची निव्वळ अफवा आहे. असं काही नाहीय.

रोहितची वनडे कर्णधारपदी निवड होण्याआधीच विराटने ब्रेक मागितला होता. आज दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहली पत्रकार परिषद घेणार आहे. त्यावेळी या संपूर्ण वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. टी-20  वर्ल्डकपनंतर विराटने टी-20 चे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले, तेव्हापासूनच संघात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरु आहेत.

रविवारी मुंबईत सराव करताना रोहित शर्माला दुखापत झाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला तो मुकणार आहे. कसोटीत कोहली संघाचे नेतृत्व करणार आहे. विराटला कौटुंबिक कारणांसाठी ब्रेक हवा आहे. पण भारताचे हे दोन्ही प्रमुख खेळाडू महत्त्वांच्या मालिकांमध्ये खेळत नसल्याने वेगळाच अर्थ काढला जात आहे.

संबंधित बातम्या: India vs South Africa: BCCI विराटची समजूत काढण्यात यशस्वी ठरणार? कोहली निर्णय बदलेल? विराट कोहली आज मौन सोडणार, वादग्रस्त प्रश्नांवर काय उत्तर देणार? INDvSA: रोहित दुखापतग्रस्त असल्याने सलामीच्या जागेसाठी ‘या’ तिघांमध्ये चुरस

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.