रोहित शर्मा की विराट कोहली, टी-20 बेस्ट बॅट्समन कोण? गावस्करांनी सांगितलं तिसरंच नाव!

डिव्हिलियर्सकडे मैदानातील कोणत्याही कोपऱ्यात बॉल मारण्याची क्षमता आहे. तो कमी चेंडूत अधिकाधिक धावा जमवतो. त्यात अनेक बॉल सीमारेषेबाहेर धाडायचे डिव्हिलियर्सला माहिती आहे, असं गावस्कर म्हणाले. (Sunil Gavaskar Says AB De Villiers Best batsman T20 Cricket)

रोहित शर्मा की विराट कोहली, टी-20 बेस्ट बॅट्समन कोण? गावस्करांनी सांगितलं तिसरंच नाव!
रोहित शर्मा, विराट कोहली आणि सुनील गावस्कर
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 3:10 PM

मुंबई :  जागतिक टी 20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज कोण? याची चर्चा नेहमीच रंगत असते. विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma), महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni), डेव्हिड वॉर्नर (David Warnner), ए बी डिव्हिवियर्स (AB De Villiers ) या खेळाडूंच्या नावांची चर्चाही होते. भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर (Sunil gavaskar) यांना टी ट्वेन्टी क्रिकेटमधला सर्वोत्तम फलंदाज कोण? असा प्रश्न विचारला गेला. यावेळी त्यांनी रोहित शर्मा किंवा विराट कोहलीचं नाव न घेता दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज ए बी डिव्हिलियर्सचं नाव घेतलं.  (Sunil Gavaskar Says AB De Villiers Best batsman T20 Cricket)

डिव्हिलियर्स सर्वोत्तम टी 20 फलंदाज

गावस्करांनी रोहित शर्मा किंवा विराट कोहलीचं नाव टी ट्वेन्टीच्या सर्वोत्तम बॅट्समनमध्ये घेतलं नाही. डिव्हिलियर्सचं मोठेपण सांगताना क्रिकेटमधला कोणताही शॉट डिव्हिलियर्स अगदी आरामात खेळू शकतो तसंच त्याच्या भात्यातही काही आक्रमक शॉट्स आहेत ज्याद्वारे तो प्रतिस्पर्धी संघांच्या चिंधड्या उडवू शकतो, असं गावस्कर म्हणाले.

डिव्हिलियर्सकडे मैदानातील कोणत्याही कोपऱ्यात बॉल मारण्याची क्षमता आहे. तो कमी चेंडूत अधिकाधिक धावा जमवतो. त्यात अनेक बॉल सीमारेषेबाहेर धाडायचे डिव्हिलियर्सला माहिती आहे. तो लांबच-लांब षटकार मारण्यात देखील माहिर आहे. एकूणच काय तर टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज बनण्यासाठी जे गुण लागतात, ते गुण डिव्हिलियर्सकडे आहेत, असं गावस्कर म्हणाले.

टी ट्वेन्टी क्रिकेट माझ्या आवडीचं

अनेक जुन्या जमान्यातील दिग्गज खेळाडूंचं टी ट्वेन्टी क्रिकेटविषयी तितकंस चांगलं मत नाहीय. याचं कारण म्हणजे टी ट्वेन्टी क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेटकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही किंबहुना कसोटीला दुय्यम मानलं जातं. परंतु गावस्करांनी मला टी ट्वेन्टी क्रिकेट आवडत असल्याचं म्हटलं आहे.

मला माहिती आहे की आमच्या जमान्यातील बऱ्याचश्या खेळाडूंना टी ट्वेन्टी क्रिकेट आवडत नाही परंतु असं असलं तरी टी ट्वेन्टी क्रिकेट मला मात्र खूप आवडतं. मला टी ट्वेन्टी आवडत त्याची दोन कारणं आहेत. एकतर तीन ते चार तासांत खेळ संपतो आणि दुसरं म्हणजे लगोलग निकाल लागतो, असं गावस्कर म्हणाले.

(Sunil Gavaskar Says AB De Villiers Best batsman T20 Cricket)

हे ही वाचा :

VIDEO : मुलाचा अनोखा हेअर कट, द ग्रेट खलीच्या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स

सुनील गावस्करांची भविष्यवाणी, भारत-इंग्लंड मालिका कोण जिंकणार, स्पष्टच सांगितलं!

Photo : विराट कोहली-अनुष्का शर्माचं मुंबईतलं घर कसं आहे? पाहा फोटो…

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.