सूर्यकुमार यादवला मिळू शकतो ICC चा हा मोठा पुरस्कार, पाहा कोण आहेत स्पर्धेत
ICC Awards : सूर्यकुमार यादव याला आयसीसीकडून मोठा पुरस्कार मिळू शकतो. 2023 साल हे सुर्यकुमार यादवसाठी चांगले ठरले आहे. त्याने या वर्षात चमकदार कामगिरी केली आहे. पण त्याच्यासोबत आणखी तीन खेळाडू या स्पर्धेत आहेत. त्यामुळे आता हा मोठा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळतो हे पाहावे लागेल.
ICC Awards : जगातील सर्वात स्फोटक खेळाडूंपैकी एक असलेल्या सुर्यकुमार यादव याला आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असल्याने यंदा मोठा पुरस्कार मिळू शकतो. सूर्यकुमार यादवसाठी २०२३ हे वर्ष खूप चांगले राहिले आहे. त्याने भरपूर रन्स काढले ज्यामुळे संघाला विजय मिळवून देण्यात त्याला यश आहे. त्यानंतर त्याला भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली. ICC ने सूर्यकुमार यादवला 2023 चा T20 प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार दिला जाऊ शकतो. या स्पर्धेत आणखी तीन जण आहेत. त्यामुळे पुरस्कार कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सूर्यकुमार यादव याच्या व्यतिरिक्त झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, न्यूझीलंडचा मार्क चॅपमन आणि युगांडाचा अल्पेश रामजानी हे देखील या स्पर्धेत आहेत. सूर्यकुमार यादव हा गेल्या वर्षभरात टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू आहे. UAE च्या मोहम्मद वसीम पहिल्या स्थानावर आहे. त्याने 23 सामन्यात 863 धावा केल्या आहेत. युगांडाच्या रॉजर मुकासा याने 31 सामन्यात 738 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने 17 डावात 733 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने वनडे सामन्यांमध्ये देखील चमकदार कामगिरी केली आहे.
सिकंदर रझा याने 11 डावांमध्ये 515 धावा केल्या आहेत. त्याने 17 विकेट्सही घेतल्या आहेत. सिकंदर रझाने चांगली कामगिरी केली. दुसरीकडे युगांडाच्या अल्पेश रमदानीने देखील 55 विकेट घेतल्या आहेत. 30 सामन्यांमध्ये त्याने 556 धावा केल्या. आता या चार खेळाडूंपैकी कोणता आयसीसी पुरस्कार मिळवण्यात यशस्वी ठरतो हे पाहायचे आहे.