T20 WC, India vs Pakistan: दुबईत आज आर-पारची लढाई, भारत-पाकिस्तानचे सर्वात मोठे चाहते दुबईत दाखल
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे जगभरात बहुतांश क्रिकेट सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात आले. आता जगभरातील परिस्थिती सुधारतेय. त्यामुळे स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज (24 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.
मुंबई : स्टेडियममध्ये क्रिकेट फॅन्स नसतील तर सामन्यांमध्ये फारशी मजा येत नाही. चाहते या खेळाचा अविभाज्य भाग आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे जगभरात बहुतांश क्रिकेट सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात आले. आता जगभरातील परिस्थिती सुधारतेय. त्यामुळे स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज (24 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये वातावरणनिर्मिती सुरु आहे. तसेच हा सामना पाहण्यासाठी दोन देशांचे चाहते दुबईत दाखल होऊ लागले आहेत. (T20 World Cup 2021 : India vs Pakistan, Bothe team Fans Reached at dubai)
आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीसाठी दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते दुबईला पोहोचत आहेत. आजच्या महामुकाबल्यासाठी पाकिस्तानचा बशीर चाचा देखील शिकागोहून दुबईला दाखल झाला आहे, तर भारतातील टीम इंडियाचा मोठा चाहते सुधीर गौतम देखील दुबईला पोहोचला आहे. भारत आणि पाकिस्तानचे हे दोन सुपर फॅन्स दुबईमध्ये भेटले तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे होते.
दरम्यान, आज भारत-पाकिस्तान सामन्याबाबत दोन्हीकडच्या फॅन्समध्ये वाद झाला. टीव्ही फोडण्यावरुन भारतीय चाहत्यांनी पाकिस्तानी फॅन्सना डिवचलं. सुधीर गौतम म्हणाला की, चाचा यावेळीदेखील पाकिस्तानात टीव्ही फोडले जातील. यावर बशीर म्हणाला की, पाकिस्तान प्रत्येक वेळी टीव्ही का फोडेल? यावेळी टीव्ही भारतात फोडले जातील. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये एकत्र दिसणाऱ्या क्रिकेटच्या या दोन सुपर फॅन्समध्ये अशीच गंमतीदार भांडणे पाहायला मिळाली.
भारतीय संघाचा चाहता सुधीर कुमार गौतम म्हणाला, “हा हाय व्होल्टेज सामना आहे. आतापर्यंत हा एक विक्रम आहे की, आम्ही पाकिस्तानविरुद्ध कधीच हरलो नाही. मला आशा आहे की भारत 2007 च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती करेल. भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मी येथे पूर्ण उत्साहाने आलो आहे.”
Dubai | It’s a high voltage match. Till now it’s a record that we haven’t lost against Pak. I am hoping that India will repeat the 2007 win (2007 ki Jeet India Karega repeat). I came here with full enthusiasm to cheer for Indian team: Sudhir, an Indian team supporter #INDvPAK pic.twitter.com/plTpp8T70p
— ANI (@ANI) October 24, 2021
पाकिस्तानी संघाचा चाहता मोहम्मद बशीर म्हणाला, “भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे याचा मला आनंद आहे. मी मनापासून प्रार्थना करतो की पाकिस्तान जिंकेल, पण एमएस धोनी माझा आवडता खेळाडू आहे. मला आशा आहे की यावेळी पाकिस्तान जिंकेल. जेणेकरून पाकिस्तानचे लोकही उत्सव साजरा करू शकतील.”
I am feeling happy that the #INDvPAK match is happening. From my heart, I pray that Pakistan should win but MS Dhoni is my favourite. I hope that Pakistan will win this time so that Pakistan people can also celebrate: Mohammad Bashir, a Pakistan team supporter pic.twitter.com/wmIcsr5mxk
— ANI (@ANI) October 24, 2021
इतर बातम्या
(T20 World Cup 2021 : India vs Pakistan, Bothe team Fans Reached at dubai)