T20 World Cup 2021 Ind vs Pak : वसीम जाफरनं वात पेटवली, पाकिस्तानच्या वर्मावर बोट, भन्नाट मीम्सद्वारे डिवचलं

T20 World Cup 2021 IndvsPak भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत आजपासून आपली मोहीम सुरु करतोय. पहिल्याच सामन्यात भारतीय संघ आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार असल्यानं वातवरण तापू लागलंय.

T20 World Cup 2021 Ind vs Pak : वसीम जाफरनं वात पेटवली, पाकिस्तानच्या वर्मावर बोट, भन्नाट मीम्सद्वारे डिवचलं
Wasim Jaffer
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 9:52 AM

T20 World Cup 2021 IndvsPak मुंबई: भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेत आजपासून आपली मोहीम सुरु करतोय. पहिल्याच सामन्यात भारतीय संघ आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार असल्यानं वातवरण तापू लागलंय. भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी टीम इंडियाचा माजी खेळाडू वसीम जाफरनं वात पेटवलीय. वसीम जाफरनं भन्नाट मीम्स शेअर करत पाकिस्तानच्या वर्मावर बोट ठेवलंय. दुबईतील सध्याचं रेकॉर्ड पाहिलं असता स्कोअर चेस करणाऱ्या टीमला फायदा होतोय मात्र, पाकिस्तानची टीम चांगली चेसर नसल्यानं आपण पहिल्यांदा बॅटिंग करावी, असा उल्लेख असणारं मीम्स वसीम जाफरनंन शेअर केलंय.

वसीम जाफरनं पाकिस्तानला डिवचलं

टीम इंडिया आज पाकिस्तान विरोधात वर्ल्डकपची मोहीम सुरु करणार आहे. वसीम जाफरनं एक मीम्स शेअर करुन पाकिस्तानच्या वर्मावर बोट ठेवतं त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. त्या मीम्समध्ये पाकिस्तान चांगला चेसर नसल्यानं टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटिंग करावी, असं त्या मीम्समध्ये म्हटलं गेलंय. पाकिस्तान पहिल्या टी-20 वर्ल्डकप फायनलमध्ये टीम इंडियाकडून देण्यात आलेला स्कोअर देखील पार करु शकला नव्हता

टीम इंडियाचं विजयावर लक्ष

पाकिस्तानच्या किंवा जगातील कोणत्याही टीम विरोधात खेळताना पूर्ण क्षमतेनं आणि विश्वासानं सामोरं जातो. आम्ही पाकिस्तानच्या मॅचसाठी पूर्ण तयारी केली असून मॅच जिंकण्यावर आमचं लक्ष असेल, असं विराट कोहली म्हणाले. आम्ही पाकिस्तान विरोधात यापूर्वी काय खेळ केला, आम्ही त्यांनी कितीवेळा पराभूत केलं याचा आम्ही विचार केला नाही. आमचं लक्ष त्या दिवशीच्या खेळावर आहे. त्या मॅचची आम्ही चांगली तयारी करतोय. पाकिस्तान ही चांगली टीम असून त्यांच्या विरोधात चांगली तयारी करुन खेळावं लागतं. आमचं लक्ष कामगिरीत सातत्य ठेवण्यावर असेल, असं विराट कोहली म्हणाला.

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

पाकिस्तान संघ: बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, हैदर अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह अफरीदी, हारिस रउफ

इतर बातम्या:

T20 World Cup 2021 IndvsPak live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत- पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना

T20 World Cup 2021: ग्रुप स्टेजमधून 4 संघ पुढील फेरीत, जाणून घ्या सुपर 12 मध्ये कुठला संघ कोणत्या गटात?

T20 World Cup 2021 India vs Pakistan Wasim Jaffer take dig of Pakistan with share memes calming Pakistan is not good chaser

'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.