T20 World Cup 2021: चॅम्पियन होण्यासाठी पाकिस्तानला आज स्कॉटलंडविरुद्धचा सामना गमवावा लागेल, पण का?

T20 विश्वचषक 2021 मध्ये पाकिस्तान विजयरथावर स्वार आहे. परंतु या संघाला विजेतेपद मिळवायचे असेल तर आज त्यांना रथाची स्वारी सोडावी लागेल.

T20 World Cup 2021: चॅम्पियन होण्यासाठी पाकिस्तानला आज स्कॉटलंडविरुद्धचा सामना गमवावा लागेल, पण का?
Pakistan Team
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 11:51 AM

मुंबई : T20 विश्वचषक 2021 मध्ये पाकिस्तान विजयरथावर स्वार आहे. परंतु या संघाला विजेतेपद मिळवायचे असेल तर आज त्यांना रथाची स्वारी सोडावी लागेल. पाकिस्तानला दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकणारा विश्वविजेता बनायचे असेल, तर आजच्या सामन्यात त्यांना जिंकण्यासाठी नव्हे तर हरण्यासाठी खेळावे लागेल. आता तुम्ही विचार करत असाल की जिंकायचं सोडून जर पाकिस्तानचा संघ हरला तर चॅम्पियन कसा काय बनू शकतो? कुठलाही संघ मैदानात हरायला का उतरेल? त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या शकुनाशी संबंधित आहेत, जो संघांना चॅम्पियन बनवण्यात उपयुक्त ठरत आहे. (T20 World Cup 2021, PAK vs SCO : Pakistan should lose match against Scotland to win Trophy, know Why?)

2021 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पाकिस्तान हा पहिला संघ ठरला आहे. याचा अर्थ असा नव्हे की, त्यांनी अंतिम फेरी गाठली आहे किंवा त्यांनी विजेतेपदावर कब्जा केला आहे. उपांत्य फेरी गाठल्यानंतर हरणे हा गुन्हा आहे. त्यामुळे पाकिस्तानला सध्याच्या टी-20 विश्वचषकात चॅम्पियन व्हायचे असेल, तर या संघाला हरावे लागेल आणि हरण्याचा पर्याय त्यांच्यासमोर केवळ आणि केवळ आजच्या सामन्यात खुला आहे. कारण या सामन्यात पराभूत झाल्याने पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या सामन्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

पाकिस्तानसाठी आजचा पराभव शुभशकुन असेल!

आतापर्यंत ज्या-ज्या संघांनी टी-20 विश्वचषक जिंकला आहे, त्या प्रत्येक संघाने स्पर्धेत एक तरी सामना गमावला आहे. यंदा पाकिस्तान विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे मात्र पाकिस्तानने स्पर्धेत अद्याप एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे पराभूत होण्याची पाकिस्तानकडे आज शेवटची संधी आहे. कारण आजच्या सामन्यानंतर कुठल्याही सामन्यात पाकिस्तानला पराभूत होऊन चालणार नाही. आज स्कॉटलंडला पराभूत केल्यावर ते अपराजित राहतील आणि उपांत्य फेरीत जातील. मात्र तसे केल्यास पाकिस्तानचा संघ जेतेपदापासून दूर जाईल. त्यामुळे सेमीफायनल खेळण्यापूर्वी आज स्कॉटलंडविरुद्धचा सामना हरणे महत्त्वाचे आहे.

स्कॉटलंडशी पराभूत होऊन पाकिस्तान चॅम्पियन होईल!

पाकिस्तान संघाचा ग्रुप स्टेजवरील हा शेवटचा सामना आहे. म्हणजेच, पराभूत होण्याचा शेवटचा पर्याय. याआधी खेळलेले सर्व 4 सामने त्यांनी जिंकले आहेत. त्यांनी भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि नामिबियाचा पराभव केला आहे. आज त्यांचा सामना स्कॉटलंडविरुद्ध आहे, ज्यांच्याविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याचा 3-0 असा विक्रम आहे. पण, पाकिस्तानला स्वत:च्या हितासाठी, तसेच दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी आज स्कॉटलंडविरुद्ध पराभव गरजेचा आहे. कारण काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते. स्कॉटलंडकडून पराभूत होऊन पाकिस्तानचा संघ जेतेपदापर्यंत पोहोचला तर यापेक्षा चांगला प्रवास कोणता असेल?

इतर बातम्या

करार संपल्यानंतर टीम इंडियाचे कोच काय करणार ? रवी शास्त्रींकडे ‘या’ खास ऑफर

Chris Gayle Retirement | पवेलियनमध्ये येताना बॅट वर केली, खेळाडूंना आलिंगन, ख्रिस गेलने संन्यास घेतला ?

तेरी जित मेरी जित, तेरी हार मेरी हार… NZ vs AFG सामन्यात भारतीय फॅन्सचा अफगाणिस्तानला पाठिंबा

(T20 World Cup 2021, PAK vs SCO : Pakistan should lose match against Scotland to win Trophy, know Why?)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.