T20 World Cup: पाकिस्तानचं सेमीफायनलचं तिकीट नक्की, भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तानसमोर कोणते पर्याय?
पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत या संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली, त्यामुळे हा संघ उपांत्य फेरीत पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत या संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली, त्यामुळे हा संघ उपांत्य फेरीत पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील या संघाने विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. या संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारताचा पराभव करून इतिहास रचला. कोणत्याही फॉरमॅटमध्ये विश्वचषक स्पर्धेतील भारतावर पाकिस्तानचा हा पहिला विजय आहे. (T20 world cup 2021 : Pakistan almost confirm semifinal ticket, know group 2 scenario, India, New Zealand stand)
भारतावरील विजयानंतर या संघाने न्यूझीलंडला पराभूत केले आणि त्यानंतर रोमहर्षक सामन्यात या संघाने अफगाणिस्तानवर मात केली. पाकिस्तानला त्यांचे शेवटचे दोन सामने स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध खेळायचे आहेत. या दोन सामन्यांमध्ये त्यांचा विजय निश्चित आहे. या कामगिरीमुळे पाकिस्तानचा संघ ग्रुप 2 मध्ये पहिल्या स्थानावर राहील याची खात्री झाली आहे. आता फक्त एकाच जागेसाठी उर्वरित संघांमध्ये शर्यत आहे.
स्कॉटलंड आणि नामिबिया हे दोन संघ इतके बलाढ्य नाहीत की ते उपांत्य फेरीत पोहोचतील. अशा स्थितीत आता तिन्ही संघांमध्ये दुसऱ्या स्थानासाठी शर्यत सुरू असून हे संघ भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान आहेत. हे तिन्ही संघ अद्याप एकमेकांविरुद्ध खेळलेले नाहीत. आणि या तीन संघांमधील सामन्यांवर उपांत्य फेरीच्या दावेदाराचे नाव लिहिले आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ आज मैदानात उतरणार आहेत. यानंतर 3 नोव्हेंबरला भारत आणि अफगाणिस्तानचा सामना होणार आहे. अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात 7 नोव्हेंबरला सामना होणार आहे. यातील दोन सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरीत जाईल.
हे तिन्ही संघ त्यांच्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात जिंकले आणि एका सामन्यात पराभूत झाले तर अशा परिस्थितीत नेट रनरेटची भूमिका महत्त्वाची ठरेल. पण इथे आणखी एक गोष्ट असू शकते. स्कॉटलंड आणि नामिबियाने या तिन्ही संघांविरुद्ध एखादा सामना जरी जिंकला तर बरंच काही बदलू शकतं.
गुणतालिकेतील परिस्थिती काय?
ग्रुप-2 च्या पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर पाकिस्तानचा संघ तीन सामन्यांपैकी सर्व सामने जिंकत सहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यांची निव्वळ धावगती (नेट रनरेट) 0.638 आहे. अफगाणिस्तानचा संघ एक विजय आणि एक पराभवासह दोन सामन्यांतून दोन गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची निव्वळ धावगती 3.092 इतकी आहे. गुणतालिकेत नामिबियाची स्थिती न्यूझीलंड आणि भारतापेक्षा चांगली आहे. हा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. या संघाने आतापर्यंत एक सामना खेळला असून त्यात विजय मिळवला आहे. त्यांचे दोन गुण आहेत. त्यांचा नेट रन रेट 0.550 इतका आहे. न्यूझीलंडने एक सामना खेळला आहे आणि त्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे, तीच स्थिती भारताची आहे. न्यूझीलंडचा संघ चौथ्या क्रमांकावर तर भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर आहे. स्कॉटलंड सहाव्या स्थानावर आहे.
इतर बातम्या
T20 World Cup: अफगाणिस्तानच्या पराभवानंतरही राशिद खान चमकला, मलिंगाला टाकलं मागे
(T20 world cup 2021 : Pakistan almost confirm semifinal ticket, know group 2 scenario, India, New Zealand stand)