T20 World Cup 2021: भारताचा सेमीफायनलचा मार्ग खडतर, पाकिस्तान-अफगाणिस्तानकडून कोंडी

टी-20 विश्वचषकाबद्दल भारतीय चाहत्यांमध्ये जी उत्सुकता होती, ती निम्मी पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर संपली. थोडीफार आशा शिल्लक होती, मात्र त्यावर अफगाणिस्तानच्या स्कॉटलंडवर मोठ्या विजयानंतर काळे ढग घिरट्या घालताना दिसू लागले आहेत.

T20 World Cup 2021: भारताचा सेमीफायनलचा मार्ग खडतर, पाकिस्तान-अफगाणिस्तानकडून कोंडी
भारतीय क्रिकेट संघ
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 12:54 PM

मुंबई : टी-20 विश्वचषकाबद्दल भारतीय चाहत्यांमध्ये जी उत्सुकता होती, ती निम्मी पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर संपली. थोडीफार आशा शिल्लक होती, मात्र त्यावर अफगाणिस्तानच्या स्कॉटलंडवर मोठ्या विजयानंतर काळे ढग घिरट्या घालताना दिसू लागले आहेत. अफगाणिस्तानने स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात स्कॉटलंडचा 130 धावांनी पराभव केला. इतक्या मोठ्या फरकाने मिळवलेल्या विजयानंतर टीम इंडियाच्या पुढे जाण्याच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. टीम इंडियाला उपांत्य फेरीपूर्वीच स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण जेव्हा सेमीफायनलचं तिकीट नेट रनरेटवर अवलंबून असेल तेव्हा भारताचा मार्ग खडतर बनेल. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची जी अवस्था झाली होती, अगदी तशीच अवस्था टीम इंडियाची होऊ शकते. (T20 World Cup 2021 : team India Way to semifinal gets difficult after Pakistan And Afghanistan biig victory)

टी-20 विश्वचषक स्पर्धेत सोमवारी (25 ऑक्टोबर) अफगाणिस्तान संघाने स्कॉटलंडवर 130 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह सुपर 12 च्या ग्रुप 2 मध्ये अफगाणिस्तान अव्वल स्थानी पोहचला आहे. टी20 क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तान संघाचा सर्वात मोठा विजय असणाऱ्या या विजयात गोलंदाज मुजीब उर रेहमान आणि राशिद खान यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. आधी फलंदाजीवेळी 190 धावा केल्यानंतर गोलंदाजीवेळी अफगाणिस्तानने स्कॉटलंडला अवघ्या 60 धावांत सर्वबाद केलं.

नेट रनरेटच्या गणितात भारत अडकला

अफगाणिस्तानने या विजयासह भारत असलेल्या ग्रुप 2 मध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोघांनी एक एक विजय मिळवला असला तरी अफगाणिस्तानचा नेट रन रेट या मोठ्या विजयामुळे तब्बल +6.500 इतका झाला आहे. त्यात भारत एक सामना पराभूत झाला आहे. ज्यामुळे भविष्यात पुढील फेरीत जाण्याची संधी येईल तेव्हा अफगाणिस्तानच्या नेट रनरेटला तोड देण्यासाठी भारताला मोठ्या विजयांची गरज आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने भारतावर 10 गडी आणि 13 चेंडू राखून मात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा नेट रनरेट +0.973 इतका आहे. त्यामुळे पाकिस्तान गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे, तर भारताचा रननेट -0.973 इतका आहे, त्यामुळे भारत आपल्या ग्रुपमध्ये खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आज पाकिस्तानच्या विजयाची अपेक्षा करावी लागणार

सुपर 12 मध्ये दोन्ही गटातील प्रत्येकी दोन संघांना उपांत्य फेरीत जायचे आहे. भारताला पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. पण, त्यात जिंकण्यासाठी रणनीती बनवण्याआधी आज पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवण्याची अपेक्षा करावी लागेल. कारण न्यूझीलंड जिंकला तर अडचणी आणखी वाढू शकतात. जर पाकिस्तानने आज न्यूझीलंडला हरवले आणि त्यानंतर 31 ऑक्टोबरला भारताने किवी संघावर मोठा विजय नोंदवला तर परिस्थिती थोडी सुधारू शकते. पण, ही आशा पूर्ण न झाल्यास भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो.

इतर बातम्या

India vs Pakistan : भारतावर विजयानंतर बाबर आजमनं संघाला दिला मोलाचा संदेश, म्हणतो ‘अतिउत्साही होऊ नका, अजून स्पर्धा बाकी आहे’

India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ

India vs Pakistan : वरुण चक्रवर्तीसारखे बोलर तर पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्येपण मिळतील, माजी पाक कर्णधाराचा हल्लाबोल

(T20 World Cup 2021 : team India Way to semifinal gets difficult after Pakistan And Afghanistan biig victory)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.