Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील T20 World Cup च्या सुपर-12 मधील टीम कन्फर्म, BAN, AFG इन, WI, SL आऊट

T20 विश्वचषक 2021 स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यावर आहे. पण, त्याआधीच पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकातील संघांची नावे निश्चित झाली आहेत.

पुढील T20 World Cup च्या सुपर-12 मधील टीम कन्फर्म, BAN, AFG इन, WI, SL आऊट
AUS vs WI
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 10:50 AM

मुंबई : T20 विश्वचषक 2021 स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यावर आहे. पण, त्याआधीच पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकातील संघांची नावे निश्चित झाली आहेत. सुपर 12 मध्ये कोणता संघ थेट खेळताना दिसणार आणि पहिल्या फेरीतून सुपर 12 मध्ये कोण प्रवेश घेणार हे निश्चित झाले आहे. या वर्षी पहिल्या फेरीतून सुपर 12 मध्ये पोहोचलेल्या बांगलादेशने पुढील वर्षासाठी डायरेक्ट सुपर-12 मध्ये प्रवेश केला आहे. मात्र, श्रीलंकेचा संघ बांगलादेशसारखा भाग्यवान ठरला नाही. पुढील वर्षीही या संघाला पहिल्या फेरीचे सामने खेळावे लागणार आहेत. तसेच श्रीलंकेसोबत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये पराभूत झालेला वेस्ट इंडिजचा संघही असेल. (T20 World Cup: Automatic Super 12 teams for 2022 T20 WC announced, BAN, AFG qualifies, West Indies, Sri Lanka out)

खरे तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेस्ट इंडिजसाठी हा सामना जिंकणे आवश्यक होते. तो जिंकला असता तरच पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 मध्ये प्रवेश केला असता. सुपर-12 मध्ये, केवळ आयसीसी रँकिंगमधील टॉप 8 संघांना स्थान मिळते. टॉप 8 मध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांची अंतिम मुदत 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत होती. पण ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर आता वेस्ट इंडिजला असे करणे शक्य झाले नाही. आयसीसी क्रमवारीत 10 व्या स्थानावर राहून त्यांनी आपली कारकीर्द संपवली. तर श्रीलंका 9 व्या स्थानावर आहे. यामुळेच या दोन्ही संघांना पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 मध्ये थेट प्रवेश मिळाला नाही.

T20 WC 2022 चे सुपर-12 संघ

दोन वेळा T20 विश्वचषक चॅम्पियन असलेल्या वेस्ट इंडिजने T-20 विश्वचषक 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या 5 पैकी 4 सामने गमावले आहेत. दुसरीकडे श्रीलंकेची कामगिरी त्यांच्यापेक्षा थोडी चांगली झाली आहे. त्यांनी बांगलादेश आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला पण इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांना विजय मिळवता आला नाही. यामुळेच या संघाला उपांत्य फेरीत प्रवेश मिळू शकला नाही. बांगलादेशसह अफगाणिस्तान संघाने पुन्हा एकदा सुपर 12 मध्ये थेट प्रवेश नोंदवला आहे. अशा प्रकारे सुपर 12 च्या संघांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. तर पहिल्या फेरीत 4 संघांची नावे निश्चित झाली आहेत. तर आणखी ४ संघ पात्र ठरतील. पहिल्या फेरीत, 8 संघ सुपर-12 च्या 4 स्पॉट्ससाठी स्पर्धा करतात.

BAN, AFG इन, WI, SL आऊट

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे संघ पुढील वर्षी होणाऱ्या T-20 विश्वचषकाच्या सुपर 12 मध्ये पात्र ठरले आहेत. पहिल्या फेरीत श्रीलंका, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड, नामिबिया व्यतिरिक्त 4 संघ पात्र ठरताना दिसतील.

इतर बातम्या

करार संपल्यानंतर टीम इंडियाचे कोच काय करणार ? रवी शास्त्रींकडे ‘या’ खास ऑफर

Chris Gayle Retirement | पवेलियनमध्ये येताना बॅट वर केली, खेळाडूंना आलिंगन, ख्रिस गेलने संन्यास घेतला ?

तेरी जित मेरी जित, तेरी हार मेरी हार… NZ vs AFG सामन्यात भारतीय फॅन्सचा अफगाणिस्तानला पाठिंबा

(T20 World Cup: Automatic Super 12 teams for 2022 T20 WC announced, BAN, AFG qualifies, West Indies, Sri Lanka out)

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.