T20 World Cup India vs Namibia live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारताचा विश्वचषकातील शेवटचा सामना
T20 World Cup: भारत विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर गेला असला तरी भारतीय संघाचा शेवटचा सामना अजून शिल्लक आहे. विशेषत: विराटचा कर्णधार म्हणून हा शेवटचा सामना असू शकतो. त्यामुळे त्याचे चाहते या सामन्यासाठीही उत्सुक असणार हे नक्की!
T20 World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघासाठी (India Cricket team) यंदाच्या विश्वचषकातील सेमीफायनलचे दरवाजे बंद झाले आहेत. कारण भारत असलेल्या गटातून आधी पाकिस्तान आणि नंतर न्यूझीलंडचा संघ पुढील फेरीत गेल्याने भारत स्पर्धेबाहेर झाला आहे. पण भारताचा विश्वचषकातील (T20 World Cup 2021) शेवटचा सामना अजूनही शिल्लक आहे. नामिबीया संघाविरुद्धचा (India vs Namibia) हा सामना विराट कोहलीचा टी20 संघाचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना असू शकतो.
भारत असणाऱ्या ग्रुप 2 मधून पाकिस्तान 4 पैकी 4 विजयांसह सर्वात आधी सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. त्यापाठी न्यूझीलंडनेही 3 सामने जिंकल्याने तो भारताच्या पुढे होता. अशावेळी न्यूझीलंडचा संघ जर आज अफगाणिस्ताविरुद्ध पराभूत झाला असता तर तोही केवळ 3 विजयासंह गुणतालिकेत राहिला असता. ज्यानंतर भारताने उद्या अर्थात 8 ऑक्टोबर रोजी नामिबीयाला नमवून न्यूझीलंड इतकेच विजय मिळवले असते. अशावेळी अफगाणिस्तान, भारत आणि न्यूझीलंड तिन्ही संघ तीन विजयांसह गुणतालिकेत असल्यास रनरेटच्या जोरावर भारतचं पुढील फेरीत पोहोचला असता. पण न्यूझीलंडने सामना जिंकल्यामुळे भारताच्या स्वप्नांवर पाणी फिरलं आहे. पण तरीही भारताचा शेवटचा सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक असतील हे नक्की!
भारत आणि नामिबीया यांच्यातील टी – 20 विश्वचषकाचा सामना कधी खेळवला जाईल?
टी – 20 विश्वचषकातील टीम इंडियाचा पाचवा आणि शेवटचा सामना आज सोमवारी (8 नोव्हेंबर) नामिबीया विरुद्ध सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाईल. नाणेफेक 7 वाजता होणार आहे.
भारत आणि नामिबीया यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?
भारत आणि नामिबीया यांच्यातील आजचा टी -20 सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाईल.
भारत आणि नामिबीया यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे होईल?
टीम इंडियाचा टी 20 विश्वचषकातील आजचा नामिबीयाविरुद्धचा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केले जातील.
भारत आणि नामिबीया यांच्यातील सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग कोठे होईल?
या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाइन पाहू शकता
संभाव्य भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी.
संभाव्य नामिबीया संघ: स्टीफन बार्ड, क्रेग विल्यम्स, जेगहार्ड एरासमस, डेविड विसे, जेजे स्मीत, जेन ग्रीन, मायकल लिनगेन, कार्ल बर्कनस्कॉक, जेन निकोल, रुबेन ट्रम्पलमन, बरनार्ड स्कॉझ
हे ही वाचा
न्यूझीलंड दौऱ्यातील टी20 सीरीजमध्ये आयपीएलमधील ‘या’ 5 युवांचे तारे चमकणार, BCCI देणार संधी!
T20 World Cup 2021 मध्ये बाबर आजम ON FIRE, ठोकलं तिसरं अर्धशतक, वर्ल्ड रेकॉर्डही धोक्यात
(T20 world cup india vs Namibia live streaming when and where to watch online match)