IND vs NZ: अश्विनला Playing XI मध्ये स्थान न देणाऱ्या कोहलीचा बुमराहकडून बचाव, सांगितलं संधी न देण्याचं कारण
टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव का झाला यावर प्रत्येकाची आपापली मते आहेत. कुणी फलंदाजांना शिव्या देत आहेत तर कुणी विराट कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
दुबई : टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव का झाला यावर प्रत्येकाची आपापली मते आहेत. कुणी फलंदाजांना शिव्या देत आहेत तर कुणी विराट कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान, ज्या निर्णयावर वेळोवेळी प्रश्न उपस्थित होत आहेत, तो म्हणजे फिरकी गोलंदाज आर. अश्विनची प्लेइंग इलेव्हनमध्ये अनुपस्थिती. अश्विन हा संघातील सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज आहे पण त्याने आतापर्यंत टी-20 विश्वचषकात एकही सामना खेळलेला नाही.
अश्विनला संघात संधी न देण्याच्या निर्णयावरुन इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक क्रॉम्प्टनने विराट कोहलीवर टीका केली आहे. त्याने ट्विट करून लिहिले की, कोहलीचे अश्विनसोबत चांगले संबंध नाहीत, त्यामुळेच अश्विनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्याने कोहलीला हुकूमशहा असे म्हटले आहे. सामन्यानंतर जसप्रीत बुमराहने आपल्या कर्णधाराच्या निर्णयाचा बचाव केला आणि अश्विनला संधी का देण्यात आली नाही हे स्पष्ट केले.
बुमरारकडून कर्णधाराचा बचाव
सामन्यानंतर अश्विनशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देताना बुमराह म्हणाला, जर आपण विचार केला की, काय झालं असतं, तर खूप काही झालं असतं. आम्ही आणखी विकेट घेऊ शकलो असतो आणि अधिक धावा करू शकलो असतो. अश्विन हा अनुभवी गोलंदाज आहे आणि जेव्हा तो संघात येईल तेव्हा तो गोलंदाजी आक्रमण मजबूत करेल. मात्र ही गोष्ट या क्षणी तरी कठीण आहे. मी म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या डावात चेंडूवर जास्त पकड नव्हती त्यामुळे चुकांना वाव होता. अश्विन आला असता तर निकाल वेगळा लागला असता असे म्हणता येईल पण सध्या तरी ही गोष्ट जज करणे कठीण आहे.
टीम इंडियाच्या निर्णयांवर गावस्कर संतापले
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर संघ निवडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया आपल्या चुका सुधारून विजयासह पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. तसेच, त्यांचे टीम कॉम्बिनेश सुधारेल असेही वाटत होते. पण विराट कोहलीने किवी संघाविरुद्ध घेतलेल्या निर्णयांनी सर्वांनाच चकित केले. याचा परिणाम असा झाला की, भारताचा आठ विकेट्सनी पराभव झाला आणि ICC T20 विश्वचषक-2021 च्या उपांत्य फेरीतील संघाचा मार्ग कठीण झाला आहे. संघात जे बदल करण्यात आले त्यात रोहित शर्माला सलामीला न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या जागी ईशान किशनला केएल राहुलसोबत डावाची सुरुवात करण्यास पाठवण्यात आले. यामुळे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर संतापले आहेत.
स्पोर्ट्स तकशी संवाद साधताना गावस्कर म्हणाले की, किशनसारख्या युवा खेळाडूला सलामीच्या फलंदाजीची जबाबदारी द्यायला नको होती. किशनला त्याचा मुंबई इंडियन्समधला सहकारी ट्रेंट बोल्टने बाद केले. त्याला आठ चेंडूत केवळ चार धावा करता आल्या. गावसकर म्हणाले, “मला माहित नाही की ही अपयशाची भीती होती की अजून काहीतरी, पण त्यांनी फलंदाजीत केलेले बदल कामी आले नाहीत. रोहित शर्मा हा दिग्गज फलंदाज असून त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. कोहली स्वतः चौथ्या क्रमांकावर आला. किशनसारख्या युवा खेळाडूवर सलामीची जबाबदारी देण्यात आली.
इतर बातम्या
T20 World Cup 2021: 2 पराभवानंतरही भारताची सेमी-फायनलची आशा शिल्लक, वाचा कशी?
T20 World Cup 2021 : निवृत्तीआधी असगर अफगाणचा मोठा कारनामा, T20I मध्ये धोनीसह 3 दिग्गजांना पछाडलं
(T20 World Cup: Should India have played R Ashwin against New Zealand? Jasprit Bumrah has his own thought)