AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2024 Super 8 Schedule: टी20 वर्ल्ड कपचे सुपर-8 चे चित्र स्पष्ट… भारताची कधी अन् कोणाबरोबर लढत, पूर्ण शेड्यूल

T20 World Cup 2024 Super 8 Schedule: सुपर-8 मध्ये प्रत्येकी 4 संघांचे दोन गट असतील. या दोन्ही गटातून दोन संघ अव्वल राहिल्यास त्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल. भारताशिवाय ग्रुप-१ मध्ये बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान आहेत. वेस्ट इंडिज, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि गतविजेता इंग्लंड यांना गट-2 मध्ये स्थान देण्यात आले आहे.

T20 World Cup 2024 Super 8 Schedule: टी20 वर्ल्ड कपचे सुपर-8 चे चित्र स्पष्ट... भारताची कधी अन् कोणाबरोबर लढत, पूर्ण शेड्यूल
team india
| Updated on: Jun 17, 2024 | 9:38 AM
Share

T20 World Cup 2024 Super 8 Schedule: टी20 वर्ल्ड कपचे सुपर-8 चे चित्र स्पष्ट आता स्पष्ट झाले आहे. रविवारी स्कॉटलंड अन् ऑस्ट्रेलिया दरम्यान सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 5 गडी राखत विजय मिळाला. त्यामुळे इंग्लंडला फायदा झाला. इंग्लंडचा संघ सुपर 8 मध्ये पोहचला. तसेच सुपर 8 मध्ये पोहचणारी सर्वात शेवटचा संघ बांगलादेशचा ठरला आहे. बांगलादेशने नेपाळचा 21 धावांनी पराभव करत सुपर 8 मध्ये प्रवेश निश्चित केला.

कोण, कोण ठरले पात्र

भारत आणि अमेरिकेचा (यूएसए) संघ गट-अ मधून पात्र ठरले आहेत. ब गटातून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा संघ सुपर 8 मध्ये आला आहे. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजने क गटातून स्थान मिळवले आहे. तर गट-ड मधून दक्षिण आफ्रिका आणि आता बांगलादेश सुपर-8 मध्ये पात्र ठरले आहेत.

सुपर-8 मध्ये प्रत्येकी 4 संघांचे दोन गट असतील. या दोन्ही गटातून दोन संघ अव्वल राहिल्यास त्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल. भारताशिवाय ग्रुप-१ मध्ये बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान आहेत. वेस्ट इंडिज, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि गतविजेता इंग्लंड यांना गट-2 मध्ये स्थान देण्यात आले आहे.

अशी रंगणार लढत

सुपर-8 मध्ये प्रत्येकी 4 संघांचे दोन गट असणार आहे. या दोन्ही गटातून दोन अव्वल संघ उपांत्य फेरीत पोहचणार आहे. ग्रुप-१ मध्ये भारताशिवाय बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान आहेत. तर दुसऱ्या गटात वेस्ट इंडिज, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड आहे.

भारताच्या लढती अशा रंगणार

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 20 जून रोजी बार्बाडोस येथे सुपर-8 टप्प्यातील पहिला सामना खेळणार आहे. हा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. यानंतर दुसरा सामना 22 जून रोजी अँटिग्वा येथे बांगलादेश विरुद्ध सामना होणार आहे. सुपर-8 मध्ये भारताचा शेवटचा सामना 24 जून सेंट लुस‍ियामध्ये ऑस्ट्रेल‍िया विरुद्ध होणार आहे. सुपर 8 मधील भारताचे सर्व सामने रात्री 8 वाजता होणार आहे.

सुपर 8 चा गट

  • गट-1: भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, अफगाणिस्तान
  • गट-2: अमेरिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका

T20 विश्वचषक 2024 मधील सुपर 8 सामन्यांचे वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार)

  • 19 जून – यूएसए विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अँटिग्वा, रात्री 8 वा
  • 20 जून – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंट लुसिया, सकाळी 6 वा
  • 20 जून – अफगाणिस्तान विरुद्ध भारत, बार्बाडोस, रात्री 8 वा
  • 21 जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा, सकाळी 6 वा
  • 21 जून – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंट लुसिया, रात्री 8 वा
  • 22 जून – यूएसए विरुद्ध वेस्ट इंडीज, बार्बाडोस, सकाळी 6 वाजता
  • 22 जून – भारत विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा, रात्री 8 वा
  • 23 जून – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सेंट व्हिन्सेंट, सकाळी 6 वाजता
  • 23 जून – यूएसए विरुद्ध इंग्लंड, बार्बाडोस, रात्री 8 वा
  • 24 जून – वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अँटिग्वा, सकाळी 6 वा
  • 24 जून – ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, सेंट लुसिया, रात्री 8 वा
  • 25 जून – अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, सेंट व्हिन्सेंट, सकाळी 6 वा
  • 27 जून – उपांत्य फेरी 1, गयाना, सकाळी 6 वाजता
  • 27 जून – उपांत्य फेरी २, त्रिनिदाद, रात्री ८
  • 29 जून – फायनल, बार्बाडोस, रात्री 8 वा
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.