Marathi News Sports Cricket news Team India made history after 48 years, defeated England by 10 wickets for the first time, Bumrah took 6 wickets, Rohit Dhawan batted
IND vs ENG : 48 वर्षानंतर टीम इंडियाने रचला इतिहास, पहिल्यांदा इंग्लंडला 10 विकेट्सने हरवले, बुमराहने घेतल्या 6 विकेटस्, रोहित-धवनच्या बॅट तळपल्या
जसप्रीत बुमराहने त्याच्या करियरमधील बेस्ट परफॉर्मन्स आज दिला. त्याने १९ रन्स देत ६ विकेट्स पटकावल्या त्यामुळे इंग्लंडची टीम 26 व्या ओव्हरमध्येच 110 रन्सवर आलआऊट झाली. इंग्लंडच्या टीमचा हा टीम इंडियाविरोधातील सर्वात कमी स्कोअर आहे.
लंडन – टीम इंडियाने (Team India) 3 वन डेच्या सीरीजमध्ये पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडचा (Beat England) 10 विकेट्सने (10 Wickets)दारुण पराभव केला आहे. गेल्या 48 वर्षांत पहिल्यांदा टीम इंडियाने इंग्लंडविरोधात ही कामगिरी केली आहे. भारताने इंग्लंडविरोधात पहिल्यांदा 1974 साली वन डे मॅच खेळली होती. 110 रन्सचे टार्गेट घेऊन मैदानादत उतरलेल्या टीम इंडियाच्या बॅट्समनपैकी सर्वाधिक रन्स या रोहित शर्माने केल्या आहेत. त्याने 58 बॉल्समध्ये 78 रन्स केले. तर धवनने 54 बॉल्समध्ये 31 रन्स केल्या. जसप्रीत बुमराहने त्याच्या करियरमधील बेस्ट परफॉर्मन्स आज दिला. त्याने १९ रन्स देत ६ विकेट्स पटकावल्या त्यामुळे इंग्लंडची टीम 26 व्या ओव्हरमध्येच 110 रन्सवर आलआऊट झाली. इंग्लंडच्या टीमचा हा टीम इंडियाविरोधातील सर्वात कमी स्कोअर आहे.
A clinical performance from #TeamIndia to beat England by 10 wickets ??
इंग्लंडच्या विरोधात वनडे मॅचमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विक्रम आता बुमराहचया नावे जमा झाला आहे. त्याने आशिष नेहराचा 19 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडला आहे. 2003 च्या वर्ल्डकपमध्ये नेहराने इंग्लंडच्याविरोधात 23 रन्स देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहसोबतच मोहम्मद शीनेही चांगली बॉलिंग करत 3 विकेट्स घेतल्या. पहिल्या 10 ओव्हरमध्येच इंग्लंडच्या 5 विकेट्स गेल्या होत्या. 2004 नंतर पहिल्यांदा अशी कामगिरी भारतीय बॉलर्सनी केली आहे.
For his exemplary bowling display, @Jaspritbumrah93 bags the Player of the Match award as #TeamIndia beat England in the first #ENGvIND ODI. ? ?
भारताकडून दहाही विकेट्स या फास्ट बॉलर्सना मिळाल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाबाबत हे आत्तापर्यंत केवळ दुसऱ्यांदा घडते आहे. यापूर्वी 2014 साली बांग्लादेशच्या विरोधात मिरपूर वनडेत असे झाले होते. त्यावेळी बिन्नीने 6 तर मोहित शर्माने 6 विकेट्स घेतल्या होत्या.
कोहली दुखापतीमुळे बाहेर
विराट कोहली दुखापतीमुळे ही मॅच खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली होती. तिसऱ्या नंबरवर येण्याची संधी अय्यरला मिळालीच नाही. रोहित शर्मा आणि शिखर धवननेच मॅच एकहाती जिंकून दिली.