टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेत 31st चं जंगी सेलिब्रेशन पाहा खास PHOTOS
सर्वच खेळाडूंनी नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले व क्रिकेट चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. दुसरा कसोटी सामना तीन जानेवारीपासून जोहान्सबर्ग मध्ये सुरु होणार आहे.
Follow us
कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या भारतीय संघाने नव्यावर्षाचे स्वागत जल्लोषात केले. सर्वच खेळाडूंनी एकत्रितपणे नववर्ष साजरे केले. या पार्टीचे फोटो खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींना प्रवेश नव्हता, त्या ठिकाणी टीम इंडियाच्या खेळाडूंनी पार्टी केली.
पार्टीच्यावेळी एकत्र आलेले दोन भारतीय युवा खेळाडू. श्रेयस अय्यर आणि रोहित शर्माच्या जागी कसोटी संघात स्थान मिळालेला प्रियांक पांचाळ आहे.
सर्वच खेळाडूंचे चेहरे आनंदाने खुलले होते. भारताचा पहिला कसोटी विजयही तितकाच खास आहे. कारण सेंच्युरियनवर कसोटी जिंकणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला आहे. भारत सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
सर्वच खेळाडूंनी नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले व क्रिकेट चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. दुसरा कसोटी सामना तीन जानेवारीपासून जोहान्सबर्ग मध्ये सुरु होणार आहे.