SA vs IND : सूर्यकुमार यादवकडे रोहित शर्माचा महारेकॉर्ड उद्धस्त करण्याची संधी, फक्त इतक्या धावांचीच गरज

Suryakumar Yadav South Africa vs India T20i Series : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 सामन्यांची टी20i मालिका खेळणार आहे. या मालिकेत कॅप्टन सूर्यकुमार यादवकडे माजी कर्णधार रोहित शर्माचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.

SA vs IND : सूर्यकुमार यादवकडे रोहित शर्माचा महारेकॉर्ड उद्धस्त करण्याची संधी, फक्त इतक्या धावांचीच गरज
suryakumar yadav and rohit sharma
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 11:10 PM

टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाची युवासेना दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 4 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. सूर्याला या मालिकेत माजी कर्णधार रोहित शर्मा याचा रेकॉर्ड उद्धवस्त करण्याची संधी आहे. सूर्याला रोहितचा नक्की कोणता विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

सूर्यकुमारकडे टी20i क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम करण्याची संधी आहे. सूर्याकडे या मालिकेतच रोहितचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सर्वाधिक टी 20i धावांचा विक्रम नेस्तानाबूत करण्याची संधी आहे. टीम इंडियाकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम रोहित शर्मा याच्या नावावर आहे. त्यानंतर दुसर्‍या स्थानी विराट कोहली आहे. तर तिसऱ्या स्थानी सूर्यकुमार आहे. आता सूर्याला विराटसह रोहितला मागे टाकण्यासाठी केवळ 84 धावांची गरज आहे. उभयसंघातील या टी 20i मालिकेचं आयोजन हे 8 ते 15 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे.

कुणाच्या नावावर किती धावा?

दरम्यान टीम इंडियासाठी रोहित शर्मा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 18 टी 20i सामन्यांमध्ये 429 धावा केल्या आहे. विराट कोहली दुसर्‍या स्थानी विराजमान आहे. विराटने 14 सामन्यांमध्ये 394 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव 7 सामन्यांमधील 346 धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. सुरेश रैना चौथ्या स्थानी आहे. रैनाने 12 सामन्यांमध्ये 339 धावा केल्या होत्या. तर शिखर धवन याने 7 सामन्यांमध्ये 233 धावा केल्या. मात्र या टॉप 5 फलंदांजापैकी सूर्यकुमार यादव याचा अपवाद वगळता सर्व टी 20i क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा सक्रीय फलंदाज हा सूर्यकुमार यादव हाच आहे.

टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 8 नोव्हेंबर, डरबन

दुसरा सामना, 10 नोव्हेंबर,

तिसरा सामना, 13 नोव्हेंबर, सेंच्युरियन

चौथा सामना, 15 नोव्हेंबर, जोहान्सबर्ग

क्षिण आफ्रिके विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशाक, अवेश खान आणि यश दयाल.

Non Stop LIVE Update
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला.
अजितदादांनीच माझं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानं खळबळ
अजितदादांनीच माझं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानं खळबळ.
36 तासांनंतर वनगा रिचेबल, पत्नी म्हणाल्या, 'मध्यरात्री तीन वाजता...',
36 तासांनंतर वनगा रिचेबल, पत्नी म्हणाल्या, 'मध्यरात्री तीन वाजता...',.
शिंदेंकडून हेलिकॉप्टरने AB फॉर्म,देवळाली-दिंडोरीमध्ये महायुतीत बंडखोरी
शिंदेंकडून हेलिकॉप्टरने AB फॉर्म,देवळाली-दिंडोरीमध्ये महायुतीत बंडखोरी.
सलमान खानला पुन्हा धमकी, ‘दोन कोटी रूपये पाठव, नाहीतर मारून टाकेन..’
सलमान खानला पुन्हा धमकी, ‘दोन कोटी रूपये पाठव, नाहीतर मारून टाकेन..’.
लोकसभेच्या मिमिक्रीचं विधानसभेला उत्तर, पवारांनी केली दादांची मिमिक्री
लोकसभेच्या मिमिक्रीचं विधानसभेला उत्तर, पवारांनी केली दादांची मिमिक्री.
अजितदादांचा भाजपच्या विरोधाला ठेंगा, विरोध डावलून नवाब मलिकांना तिकीट
अजितदादांचा भाजपच्या विरोधाला ठेंगा, विरोध डावलून नवाब मलिकांना तिकीट.
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?.
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास..
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास...