T20 विश्वचषकानंतरचं भारतीय संघाचं वेळापत्रक जाहीर, 7 महिन्यांत 4 संघासोबत भिडणार, भारतीय भूमीत ‘या’ ठिकाणी होतील सामने
इकडे 14 नोव्हेंबरला T20 वर्ल्ड कप स्पर्धेचा विजेता घोषित होईल आणि दुसरीकडे भारतीय क्रिकेट मातृभूमीत विविध अशा चार संघाशी सामने खेळायला सुरुवात करेल. याची सुरुवात न्यूझीलंड सोबत होणार आहे.
मुंबई: सध्या भारतीय संघ आयपीएल 2021 (IPL 2021) चे उर्वरीत पर्व खेळण्यात व्यस्त आहेत. दरम्यान आयपीएल संपताच लगेच त्याच ठिकाणी म्हणजे युएईत बहुप्रतिक्षित अशा T20 वर्ल्ड कपची (ICC T20 World Cup) स्पर्धा सुरु होणार आहे. 12 संघ खेळत असलेल्या या विश्वचषकाचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा सामना झाल्यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट संघ विविध अशा चार देशांना भारतात खेळण्यासाठी घेऊन येणार आहे. यामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. या सर्व सामन्यांचे वेळापत्रकही नुकतेच जाहीर झाले असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळलाने (BCCI) त्यांच्या एपेक्स काउंसिल मीटिंगमध्ये ही माहिती दिली. या वेळापत्रकात विविध देशांसोबक भारत 4 टेस्ट, 3 वनडे आणि 14 T20 सामने खेळणार आहे.
या संपूर्ण सामन्यांची सुरुवात न्यूझीलंड क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर येताच होणार आहे. डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात 3 T20 आणि 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. तर हे वेळापत्र सविस्तरपणे पुढीलप्रमाणे असेल…
न्यूझीलंड संघाचा भारत दौरा
17 नोव्हेंबर रोजी या दौऱ्याची सुरुवात होईल. यावेळी पहिला T20 सामना जयपुरमध्ये, दुसरा T20 सामना 19 नोव्हेंबरला रांचीमध्ये आणि तिसरा आणि शेवटचा T20 सामना 21 नोव्हेंबरला कोलकाता येथे खेळवला जाईल. T20 मालिकेनंतर कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिली कसोटी 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान कानपुरच्या ग्रीन पार्क येथे खेळवली जाईल. त्यानंतर दुसरी टेस्ट मॅच 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर या काळात मुंबच्ईया वानखेड़े मैदानात खेळवली जाईल.
2022 वर्षाची सुरुवात वेस्ट इंडीजच्या दौऱ्याने
न्यूझीलंड संघाचा दौरा होताच वेस्ट इंडीजचा संघ भारतात 3 वनडे आणि 3 T20 सामने खेळण्यासाठी येणार आहे. यातील पहिला सामना 6 फेब्रुवारी रोजी होईल. पहिली वनडे मॅच 6 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये, दुसरी वनडे 9 फेब्रुवारीला जयपुर आणि तिसरी 12 फेब्रुवारीला कोलकाता येथे खेळवली जाईल. वनडे मालिका संपताच 15 फेब्रुवारीपासून T20 मालिकेला सुरुवात होईल. पहिला T20 सामना ओडीशाच्या कटकमध्ये तर दुसरा आणि तिसरा T20 सामना 18 आणि 20 फेब्रुवारी रोजी वायजेग आणि त्रिवेंद्रम येथे खेळवला जाईल.
फेब्रुवारी-मार्चमध्ये श्रीलंकेचा दौरा
25 फेब्रुवारीपासून श्रीलंका आणि भारत यांच्यातील सामने सुरु होतील. श्रीलंका टीम 2 टेस्ट आणि 3 T20 सामने भारतासोबत खेळणार आहे. यामध्ये पहिली टेस्ट मॅच 25 फेब्रुवारीपासून ते 1 मार्च पर्यंत बंगळुरु येथे होईल. तर दुसरी टेस्ट मॅच मोहाली येथे 5 मार्च ते 9 मार्च दरम्यान खेळवली जाईल. त्यानंतर 13 मार्चपासून मोहाली येथे T20 सामन्यांना सुरुवात होईल. पहिल्या सामन्यानंतर दुसरा सामना 15 मार्च आणि तिसरा सामना 18 मार्च रोजी अनुक्रमे धर्मशाला आणि लखनऊ येथे खेळवला जाईल.
IPL 2022 नंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर येणार
श्रीलंका दौरा झाल्यानंतर पुन्हा एकदा आयपीएलचे (IPL 2022) आयोजन होईल. 8 नाही तर 10 संघाची स्पर्धा या आयपीएलमध्ये एप्रिल आणि मेमध्ये रंगेल. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ 5 T20 सामने खेळण्यासाठी भारतात येईल. 9 जून 2022 ते 19 जून 2022 असे 10 दिवस हा दौरा असेल. यामध्ये 9 जूनला पहिला T20 सामना चेन्नईमध्ये पार पडेल. त्यानंतर 12 , 14, 15 आणि 19 जून रोजी बंगळुरु, नागपुर, राजकोट आणि दिल्ली याठिकाणी पुढील चारही T20 सामने पार पडतील.
हे ही वाचा-
जय शहांनी पेटारा उघडला, देशांतर्गत क्रिकेटपटूंना मालामाल करणार, एका खेळाडूला किती रुपये मिळणार?
तालिबानकडून IPL बॅन, चिअर लीडर्स डोळ्यात खुपतात? अफगाणिस्तानमध्ये आयपीएलचे ढोल थंडच
IPL 2021 : मुंबईला पोलार्डची एक चूक नडली, म्हणूनच चेन्नईने विजयाची साखर खाल्ली!
(Team india will host matches in india agaisnt new zealand west indies sri lanka and south africa after t20 world cup)