T20 World Cup साठी भारतीय संघाची रणनीती ठरली, अशी असेल टीम इंडिया, काय म्हणाले रवी शास्त्री?

टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजसचे सामने सुरु आहेत. भारत हा सुपर 12 मध्ये असल्याने भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

T20 World Cup साठी भारतीय संघाची रणनीती ठरली, अशी असेल टीम इंडिया, काय म्हणाले रवी शास्त्री?
विराट आणि रवी शास्त्री
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 4:22 PM

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ (Team India) विश्वचषकासाठी संपूर्णपणे तयार झाला असून सराव सामन्यांना सुरुवातही झाली आहे. पहिल्याच सराव सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला 7 विकेट्सनी मात दिली आहे. दरम्यान संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी या स्पर्धेदरम्यान भारताची रणनीती कशी असेल तसेच अंतिम 11 खेळाडू कोण असतील? याबाबत माहिती दिली आहे.

या टी20 वर्ल्ड कपनंतर शास्त्री त्यांच्या पदावरुन पायउतार होणार आहेत. तसेत कर्णधार विराटही टी20 संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. यामुळे हे दोघेही या स्पर्धेत भारताला जिंकवण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करतील हे नक्की! दरम्यान सध्या सुरु असलेल्या सराव सामन्यातून खेळाडूंचा फॉर्म आणि मैदानाची स्थिती यातून अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल? हे ठरवले जाणार आहे. दरम्यान शास्त्री यांनी भारताचे माजी यष्टीरक्षक दीप दासगुप्ता यांच्याशी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना माहिती दिली की, ”आम्ही सर्वांत आधी मैदान आणि वातावरणाची परिस्थिती जाणून घेणार आहोत. दुबईत सायंकाळच्या सुमारास दव पडत असल्याने सामन्यात गोलंदाजाना विविध अडचणी येऊ शकतात. त्यामुळे त्या दिवशीचीच परिस्थिती पाहून प्रथम फलंदाजी कि गोलंदाजी तसेत अतिरिक्त वेगवान गोलंदाज की फिरकीपटू हा देखील निर्णय घेणार आहोत.”

आयपीएलमुळे अधिक सरावाची गरज नाही

पुढे बोलताना शास्त्री म्हणाले, ”भारतीय खेळाडू मागील महिनाभर आयपीएल खेळत असल्याने या मैदानांची स्थिती त्यांना माहित आहे. त्यामुळे अधिक सरावाची अपेक्षा खेळाडूंना नसून काही सराव सामने हे त्यांना एकत्र खेळण्याची सवय होण्यासाठी पुरेसे आहेत. तसंच या सराव सामन्यातूनच नेमके कोणते खेळाडू कसा खेळ करत आहेत हे कळेल आणि त्याप्रमाणे अंतिम 11 खेळाडू निवडले जातील.”

पहिला सराव सामना खिशात

पहिल्याच सराव सामन्यात भारताने इंग्लंडला 7 विकेट्सने मात दिली. या सामन्यात भारताने सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. त्यानंतर इंग्लंडने मात्र दमदार फलंदाजी करत 188 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. यामध्ये बेयरस्टोच्या 49, लियामच्या 30 धावांसह मोईन अलीने अखेरच्या काही षटकात 20 चेंडूत केलेल्या नाबाद 43 धावांनी धावसंख्या वाढवण्यात मोठं योगदान दिलं. ज्यामुळे संघाचा स्कोर भलामोठा झाला. भारताकडून गोलंदाजीत शमीने उत्तम गोलंदाजी करत महत्त्वाच्या 3 विकेट्स घेतल्या. तर राहुल चाहरने आणि बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली. ज्यामुळे भारताला विजयासाठी 189 धावांचे आव्हान होते.

या तगड्या आव्हाना पाठलाग करण्यासाठी आलेले भारतीय फलंदाज सुरुवातीपासून चांगल्या लयीत होते. रोहित शर्मा नसल्याने केएल राहुल सोबत इशान किशन सलामीला आला. यावेळी 82 धावापर्यंत एकही विकेट गेला नव्हता. तोवर राहुलने 51 धावा करत अर्धशतकही लगावलं. राहुल अर्धशतक होताच बाद झाला. ज्यानंतर कोहलीही 11 धावा करुन बाद झाला. पण इशानने मात्र धमाकेदार फलंदाजी सुरु ठेवली पण अखेर 70 धावा झाल्या असताना त्याने विश्रांती घेण्यासाठी स्वत:हून माघार घेतली. त्यानंतर सूर्यकुमार 8 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर ऋषभ पंतने (नाबाद 29) आणि हार्दीकने (नाबाद 12) एक ओव्हर राखून भारताला विजय मिळवून दिला.

विश्वचषकाच्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दीक पंड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

हे ही वाचा

T20 World Cup 2021, India vs England: सराव सामन्यात भारताची सरशी, इंग्लडवर 7 गडी राखून विजय

T20 World Cup 2021: इंग्लंडचा संघ अडचणीत, भारताविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान धडाकेबाज खेळाडू जखमी

T20 World Cup 2021: श्रीलंकेचा नाम्बियावर 7 विकेट्सनी विजय, पण चर्चा ‘त्या’ कॅचची

(Team indians Head coach Ravi Shastri says how will team india play and choose which players in T20 world Cup 2021)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.