Viral : सोशल डिस्टन्सिंगसह खेळू शकतो का क्रिकेट? यूझरच्या प्रश्नाला दिल्ली पोलिसांचं भन्नाट उत्तर
दिल्ली पोलिसां(Delhi Police)चं एक ट्विट सध्या खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीनं दिल्ली पोलिसांना एक प्रश्न विचारलाय आणि त्यावर दिल्ली पोलिसांनी अतिशय मजेशीर उत्तर दिलंय.
नवी दिल्ली : दिल्लीत सध्या वीकेंड कर्फ्यू लागू आहे. म्हणजेच आजपासून सोमवार सकाळपर्यंत कर्फ्यू लागू राहणार आहे. या काळात लोकांना घरातून बाहेर पडू दिले जाणार नाही, ते फक्त आपत्कालीन परिस्थितीतच बाहेर पडू शकतात. यासंदर्भात दिल्ली पोलिसां(Delhi Police)चं एक ट्विट सध्या खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीनं दिल्ली पोलिसांना एक प्रश्न विचारलाय आणि त्यावर दिल्ली पोलिसांनी अतिशय मजेशीर उत्तर दिलंय.
पोलिसांचं भन्नाट उत्तर ट्विटरवर पुनीत शर्मा नावाच्या व्यक्तीनं गंमतीत प्रश्न विचारला, की आम्ही सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावून क्रिकेट खेळू शकतो का? तर दिल्ली पोलिसांनीही मजेशीर पद्धतीनं उत्तर दिलंय. दिल्ली पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिलंय, की ‘हा ‘सिली पॉइंट’ आहे सर. ‘Extra Cover’ घेण्याची वेळ आली आहे. याशिवाय दिल्ली पोलिस ‘Catching’मध्येही माहीर आहेत.
That’s a ‘Silly Point’, Sir. It is time to take ‘Extra Cover’. Also, #DelhiPolice is good at ‘Catching’. https://t.co/tTPyrt4F5H
— #DelhiPolice (@DelhiPolice) January 7, 2022
मजेशीर कमेंट्स ट्विटरवरच्या दिल्ली पोलिसांच्या या ट्विटला कमेंट्सही मजेशीर आल्या आहेत. एका यूजरनं दिल्ली पोलिसांच्या या उत्तराला ‘ऐतिहासिक उत्तर’ म्हटलंय. तर दुसऱ्या यूजरनं कमेंट केलीय, की, ‘बढ़िया है. आप भी गजब हो’. त्याचप्रमाणे आणखी एका यूजरनं विनोदी पद्धतीनं लिहिलं, की ‘चलेगा भीमसेनी लट्ठ और बंदा तारामंडल में…’, तर दुसर्या यूझरनं ‘आमच्या दिल्ली पोलिसांची फलंदाजी चांगली आहे, कधीतरी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करा’, अशी टिप्पणी केलीय.
कोरोनाची स्थिती
देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) पुन्हा एकदा आपले हात-पाय वेगानं पसरतोय. गेल्या 24 तासांत संसर्गाच्या 1 लाख 41 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झालीय. तर जवळपास 285 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या राज्यांमध्ये आहे. जिथे महाराष्ट्रात 40 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळलेत. पश्चिम बंगालमध्ये 18 हजार आणि दिल्लीत 17 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची पुष्टी झालीय. कानपूर आयआयटीच्या एका शास्त्रज्ञाने गणितीय मॉडेलच्या आधारे दावा केलाय, की जेव्हा कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) आपल्या उच्च स्थानी असेल, तेव्हा दिल्लीत दररोज 35 ते 70 हजार संसर्गाची प्रकरणं असतील.