U19 World Cup: पहिल्याच सामन्यात भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं चॅलेंज, सिनियर संघाच्या पराभवाचा वचपा काढणार?

अंडर 19 वर्ल्डकप आधी झालेले दोन्ही सराव सामने भारताने जिंकले आहेत. भारताने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज आणि दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 टीमला हरवलं होतं.

U19 World Cup: पहिल्याच सामन्यात भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं चॅलेंज, सिनियर संघाच्या पराभवाचा वचपा काढणार?
भारतीय अंडर 19 संघ (Photo: Asian Cricket Council)
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 8:51 AM

दीनानाथ परब

मुंबई: अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकप (Under 19 Cricket World Cup) स्पर्धेत आजपासून भारताचे (India U19) अभियान सुरु होत आहे. भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होत आहे. ग्रुप स्टेजमध्ये यश धुलच्या (Yash Dhull) भारतीय संघासमोर दक्षिण आफ्रिकेच्या रुपाने एक अवघड आव्हान आहे. भारताने हा सामना जिंकला, तर उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित होईल. कारण पुढचे दोन सामने तितके कठीण नाहीत. कालच दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या सिनियर संघाचा पराभव झाला होता. 2-1 ने ही मालिका भारताने गमावली होती. सराव सामन्यातील आपला फॉर्म कायम राखण्याचा अंडर 19 टीमचा प्रयत्न असेल. सराव सामन्यात भारताच्या अंडर 19 टीमने वेस्ट इंडिजचा अक्षरक्ष: धुव्वा उडवला होता.

अंडर 19 वर्ल्डकप आधी झालेले दोन्ही सराव सामने भारताने जिंकले आहेत. भारताने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज आणि दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 टीमला हरवलं होतं. दुसऱ्याबाजूला दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही आपले सराव सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज विरुद्धचा सराव सामना सात विकेटने जिंकला होता. त्यामुळे आज अटी-तटीचा सामना होईल, अशी अपेक्षा आहे.

अंडर 19 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिका भारतापेक्षा वरचढ अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला आहे. आकडेवारीच याबद्दल सर्वकाही सांगून जाते. दोन्ही देशांच्या अंडर 19 टीममध्ये आतापर्यंत 22 सामने झाले आहेत. यात 16 वेळा भारत जिंकला आहे, तर फक्त सहा वेळा दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकलाय. जास्त सामने भारताने जिंकले असेल, तरी अंडर 19 वर्ल्डकप मध्ये दक्षिण आफ्रिका भारतावर वरचढ ठरली आहे. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत सात सामने झाले आहेत. त्यात भारताने तीन तर दक्षिण आफ्रिकेने चार सामने जिंकले आहेत.

वेस्ट इंडिजमध्ये पहिल्यांदा भारत-दक्षिण आफ्रिकेत होणार सामना वेस्ट इंडिजमध्ये आज पहिल्यांदाच भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सामना होत आहे. यश धुलच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. अलीकडच्या काळात भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. 2020 नंतर दोन्ही संघ दोनवेळा आमने-सामने आले आहेत. हे दोन्ही सामने भारताने जिंकलेत.

संबंधित बातम्या

IND vs SA: 30 वर्षात धोनीच्या नेतृत्वातच टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेत सरस कामगिरी, जाणून घ्या रेकॉर्ड IND vs SA: ‘ओय एक मॅच तो अच्छा खेल के जाओ’, कॅच सुटली नेटीझन्सनी पुजाराची वाट लावली IND vs SA: ‘बाहेरच्या लोकांना माहित नसतं, मैदानात काय…’, विराटचं DRS वादावर मोठ विधान

(u 19 world cup 2022 yash dhull india u19 take on south africa in west indies)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.