एक पोस्ट दोन कोटी लाईक…विराटचा सोशल मीडियावर अनोखा विक्रम, भारतात अशी कामगिरी करणारा पहिलाच

Virat Kohli post record viral on social media: भारतात इस्टांग्रामवर सर्वाधिक लाईक कियारा आडवाणी सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाच्या घोषणेच्या पोस्टला यापूर्वी मिळाल्या होत्या. तो विक्रम विराटच्या पोस्टने मोडला आहे. विराट कोहलीने आता टी 20 प्रकारतून निवृत्ती घेतली आहे. एकदिवशीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये तो खेळताना क्रिकेटप्रेमींना दिसणारच आहे.

एक पोस्ट दोन कोटी लाईक...विराटचा सोशल मीडियावर अनोखा विक्रम, भारतात अशी कामगिरी करणारा पहिलाच
team india
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 1:56 PM

भारताने टी 20 विश्वचषक जिंकला. तब्बल 17 वर्षांनी भारताने पुन्हा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले. त्यानंतर संपूर्ण देश आनंदात बुडाला. भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यात विराट कोहली यांची खेळी महत्वाची ठरली. त्यामुळे सामन्याचा सामनावीर पुरस्कार विराट कोहली याला मिळाला. क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या विराटने सोशल मीडियाच्या मैदानाही अनोखा विक्रम केला आहे. भारताच्या विजयानंतर विराट कोहली पोस्ट इन्टाग्रामवर शेअर केली. या पोस्टला दोन कोटींपेक्षा जास्त लाईक मिळाल्या आहेत. आशिया खंडात सर्वाधिक लाईक मिळवणार विराट कोहली दुसरा व्यक्ती ठरला आहे. भारतात एखाद्या पोस्टला सर्वाधिक लाईक मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

टीम इंडियाच्या जल्लोषाची भावनिक पोस्ट

विराट कोहली याने टीम इंडियाचा भावनिक पोस्ट टाकली होती. टीम इंडियाचा संघ विजेतेपदासह त्या पोस्टमध्ये दिसत आहे. त्यात विराटने म्हटले, “मी यापेक्षा चांगल्या दिवसाचे स्वप्नही पाहिले नसते. देव महान आहे आणि मी कृतज्ञतेने त्याच्यासमोर माझे डोके टेकवतो. शेवटी आम्ही करुन दाखवले. जय हिंद!” विराटने ही पोस्ट टाकून तीनच दिवस झाले. त्याला 20 दक्षलक्ष पेक्षा जास्त लाईक मिळाला. हजारो जणांनी प्रतिक्रिया दिल्या.

हे सुद्धा वाचा

विराटची क्रिकेटप्रमाणे सोशल मीडियावर लोकप्रियता

विराट कोहली क्रिकेटप्रमाणे सोशल मीडियामध्ये लोकप्रिय आहे. 270 दशलक्ष त्याचे फॉलोअर्स आहे. त्याने कोणतीही पोस्ट टाकली तरी लाखोंमध्ये लाईक मिळतात. आता भारतीय संघाने विजतेपद मिळाल्यानंतर केलेल्या पोस्टने विक्रमच केला आहे. टी 20 विश्वचषकात भारताच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या कोहलीच्या पोस्टने संघाच्या यशात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली आहे. ही पोस्ट भारतीय क्रिकेट संघ आणि त्याच्या चाहत्यांचा सामूहिक आनंद देणारी ठरली आहे. कोहली एक जागतिक आयकॉन आणि लोकप्रियव्यक्ती बनला आहे.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

कियारा आडवाणी सिद्धार्थ मल्होत्राचा विक्रम मोडला

भारतात इस्टांग्रामवर सर्वाधिक लाईक कियारा आडवाणी सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाच्या घोषणेच्या पोस्टला यापूर्वी मिळाल्या होत्या. तो विक्रम विराटच्या पोस्टने मोडला आहे. विराट कोहलीने आता टी 20 प्रकारतून निवृत्ती घेतली आहे. एकदिवशीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये तो खेळताना क्रिकेटप्रेमींना दिसणारच आहे.

हे ही वाचा…

विराटने पत्नी अनुष्काला व्हिडिओ कॉलवर दाखवली चक्रीवादळाची भीषणता, बारबाडोसमध्ये अडकली टीम इंडिया

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.