Virat Kohli Press Conference: पुजारा-रहाणे संघासाठी अनमोल – विराट कोहली
दक्षिण आफ्रिकेत आल्यापासून विराटने पत्रकार परिषद घेतलेली नाही. द्रविडनेच दोन्ही पत्रकार परिषदांना संबोधित केलं आहे. विराटच्या अनुपस्थितीवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.
केपटाऊन: भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आज दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील पहिली पत्रकार परिषद घेणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मालिकेतील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना 11 जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्याआधी कोहली आज मीडियाशी बोलेल. कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याआधी पत्रकार परिषद घेतली होती. ती वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत आल्यापासून विराटने पत्रकार परिषद घेतलेली नाही. द्रविडनेच दोन्ही पत्रकार परिषदांना संबोधित केलं आहे. विराटच्या अनुपस्थितीवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. अखेर आता विराट स्वत: पत्रकार परिषद घेणार आहे.