Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

#Virat Kohli: आकडे खोटं बोलणार नाहीत! विराट भारताचाच नाही, कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला चौथा यशस्वी कॅप्टन

विराटला 2014 मध्ये सर्वप्रथम कर्णधारपदाची संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत मध्यावरच एमएस धोनीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले.

#Virat Kohli: आकडे खोटं बोलणार नाहीत! विराट भारताचाच नाही, कसोटी क्रिकेटच्या इतिहासातला चौथा यशस्वी कॅप्टन
Virat Kohli
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 9:10 PM

मुंबई: भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) शनिवारी तडकाफडकी राजीनामा देऊन सर्वांनाच धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काल कसोटी मालिका 2-1 अशी हरल्यानंतर विराटने आज कॅप्टनशिपचा राजीनामा दिला. विराटने याआधी टी-20 ची कॅप्टनशिप सोडली आहे. आता वनडे आणि टी-20 चे नेतृत्व रोहित शर्माकडे (Rohit sharma) आहे. विराटला वनडेच्या कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं. त्यावरुन वाद झाला. कारण विराटला वनडेची कॅप्टनशिप सोडायची नव्हती. पण बीसीसीआयला मर्यादीत षटकांसाठी दोन वेगवेगळे कर्णधार नको होते.

विराटला 2014 मध्ये सर्वप्रथम कर्णधारपदाची संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत मध्यावरच एमएस धोनीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर विराट भारताचा नवा कॅप्टन बनला. त्याने 68 कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले. यात 40 सामन्यात भारत जिंकला. 17 कसोटीत पराभव झाला. एका कठीण परिस्थितीत विराटकडे संघाचे नेतृत्व आले होते. त्याने स्वत:चा खेळ उंचावला व जागतिक क्रिकेटमध्ये एक यशस्वी कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध केले.

दौऱ्याच्या मध्यावर धोनीने राजीनामा दिला आणि… ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2014 मध्ये विराट कर्णधार म्हणून पहिला सामना खेळला, तर केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधार म्हणून त्याचा शेवटचा कसोटी सामना ठरला. कोहलीच्याच नेतृत्वाखाली भारताकडे घातक वेगवान गोलंदाजांचा ताफा तयार झाला, जे परदेशातील खेळपट्ट्यांवर 20 विकेट घेऊ शकतात. मागच्या दोन वर्षांपासून कोहलीच्या बॅटमधून धावा आटल्या आहेत, आता कर्णधारपदाची जबाबदारी नसल्यामुळे तिन्ही फॉरमॅटमध्ये पुन्हा एकदा विराट धावांच्या राशी उभारेल अशी अपेक्षा आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील चौथा यशस्वी कर्णधार कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (68) सामने खेळले. त्यात (40) लढतींमध्ये विजय मिळाला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील कोहली चौथा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथने आपल्या संघाला सर्वाधिक (53) विजय मिळवून दिले. त्यानंतर रिकी पाँटिगने (48), स्टीव्ह स्मिथने (41) आणि त्यानंतर कोहली चौथ्या नंबरवर आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 58.82 आहे.

कसोटी कर्णधार म्हणून 5,864 धावा भारताचा कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा विराटच्या नावावर आहेत. 68 कसोटी सामन्यात विराटने कॅप्टन म्हणून 5,864 धावा केल्या.

(Virat Kohli steps down after unprecedented heights as Test captain 40 wins in 68 matches)

आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.