Virat Kohli | सोशल मीडियावरील कमाईबाबत विराट कोहलीचं ट्विट; इन्स्टाग्रामच्या फी बद्दल स्पष्टच म्हणाला..

2023 या वर्षात इन्स्टाग्रामवरील सर्वांत श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार विराट हा तिसऱ्या स्थानी आहे. तर ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या आणि मेस्सी दुसऱ्या स्थानावर आहे.

Virat Kohli | सोशल मीडियावरील कमाईबाबत विराट कोहलीचं ट्विट; इन्स्टाग्रामच्या फी बद्दल स्पष्टच म्हणाला..
Virat Kohli Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 11:59 AM

मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : क्रिकेटर विराट कोहलीच्या सोशल मीडियाबद्दल नवीन वृत्त समोर आलं. इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग ॲपवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये विराट तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं म्हटलं गेलं. इतकंच नव्हे तर एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी तो किती रुपये मानधन घेतो, याचीही माहिती समोर आली होती. या सर्व वृत्तांवर आता विराटने ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. विराटने हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. ट्विटरद्वारे त्याने याबद्दलची माहिती दिली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावरही त्याची फॅन फॉलोइंग थक्क करणारी आहे. त्याने एक फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करताच त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.

विराट कोहलीचं स्पष्टीकरण-

‘मला माझ्या आयुष्यात जे काही मिळालं, त्यासाठी मी कृतज्ञ आणि ऋणी आहे. पण माझ्या सोशल मीडिया कमाईबाबत जे वृत्त पसरतंय, ते खरं नाही’, असं ट्विट विराटने केलं आहे. इन्स्टाग्रामवर विराटचे तब्बल 25 कोटी 52 लाख 69 हजार 526 फॉलोअर्स आहेत. त्यावर पोस्ट केलेल्या एका फोटोसाठी तो तब्बल 11.45 कोटी रुपये घेत असल्याचं वृत्त देण्यात आलं होतं.

हे सुद्धा वाचा

2023 या वर्षात इन्स्टाग्रामवरील सर्वांत श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार विराट हा तिसऱ्या स्थानी आहे. तर ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या आणि मेस्सी दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीनुसार बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात प्रियांका चोप्रा 29 व्या स्थानी  असून एका पोस्टसाठी ती 4.40 कोटी रुपये घेते. या वृत्तावर अद्याप प्रियांकाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

2023 च्या इन्स्टाग्रामवरील सर्वांत श्रीमंत सेलिब्रिटींच्या या यादीत सेलिना गोमेज, कायली जेनर, डायने जॉन्सन, एरियाना ग्रांडे, किम कर्दाशियन, बियॉन्से, ख्लो कर्दाशियन, जस्टीन बिबर, केंडल जेनर, टेलर स्विफ्ट, जेनिफर लोपेज, निकी मिनाज, कोर्टनी कर्दाशियन, मायली सायरल, केटी पेरी, नेमार ज्युनियर, केविन हार्ट, कार्डी बी, डेमी लोवाटो, रिहाना, बिली एलिश आणि कायलियन एमबाप्पे यांचा समावेश आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.