VIDEO : फलंदाजीची शिकवणी देणाऱ्या पत्रकाराला विराटचं हटके उत्तर, दोन शब्दातच केली बोलती बंद
भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात आक्रमक आणि गरम स्वभावाचा कर्णधार म्हणून विराटला ओळखलं जातं. विराटने अनेकदा मैदानावर आपल्या आक्रमक स्वभावाचं दर्शन घडवलं आहे.
लंडन : विराट कोहली (Virat Kohli) कायमच मैदानावर एक आक्रमक आणि अग्रेसिव असा खेळाडू, कर्णधार या रुपात पाहिलं जातं. तो कायम आपल्या भावना अगदी दिलखुलासपणे सर्वांसमोर जाहीर करतो. त्याचा आनंद, राग सारंकाही कायमच पाहायला मिळतं. अनेकदा संघावर किंवा एखाद्या खेळाडूबाबत कोणी चूकीचं वक्तव्य केल्यास सर्वात आधी विराटच चोख प्रत्युत्तर देत असतो.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टेस्टनंतर मात्र विराट कोहली एका वेगळ्याच अंदाजात दिसला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विराटला एक प्रश्न विचारला जो त्याला रागा आणून देण्यासाठी पुरेसा होता. मात्र कोहलीने असे न करता अगदी शांतपणे दोन शब्दात असं उत्तर दिलं की पत्रकाराची बोलतीच बंद झाली. या संभाषणाचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
विराट कोहलीने बंद केली बोलती
तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला एक डाव आणि 76 धावांनी पराभूत केलं. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत कर्णधार विराटला अनेक पत्रकार सामन्यासंबधी प्रश्न विचारत होते. यावेळी एका पत्रकाराने विराटला भारतीय गोलंदाजांनी कशाप्रकारे इंग्लंडच्या गोलंदाजीचा सामना करायला हवा होता? असा प्रश्न विचारला. यावर विराटने उत्तर देण्याआधीच पत्रकाराने स्वत:च ज्ञान झाडण्यास सुरुवात केली. तो म्हणाल, ‘इंग्लंडचे गोलंदाज पॅडवर बोल टाकत होते. त्यामुळे भारतीय फलदाजांनी मागे जाऊन खेळायला हवे होते.’ पत्रकाराच्या या वक्तव्यावर विराटला राग आल्याचं दिसत होतं पण विराटने अगदी शांत राहत त्याला ‘ओके, धन्यवाद!’ असा ‘कूल’ रिप्लाय देत संभाषण तिथेच संपवत पत्रकाराची बोलतीच बंद केली. या सर्वावर विराट फॅन्सनी विराटचं कौतुक केलं असून त्याने दुसऱ्या डावात ठोकलेल्या संयमी अर्धशताकीचंही कौतुक केलं जात आहे.
Remarkable self-control by @imVkohli.
In a sense, it’s a classic Twitter moment. Person with zero knowledge & zero self-awareness tries to give random gyan to actual practitioner.pic.twitter.com/P3FoLVxllD
— Amit Varma (@amitvarma) August 28, 2021
हे ही वाचा :
तिसऱ्या कसोटीत पराभूत होणारी टीम इंडिया ‘युजलेस’; मायकल वॉनचा विराटसेनेवर वार
(Virat Kohlis Epic reply to reporter who trys to teach virat Batting skills)