…तर सचिन तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मण आंतरराष्ट्रीय सामने खेळूच शकले नसते, वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने खेळाडूंच्या निवड प्रक्रियेवर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे (Virender Sehwag on Yo-Yo fitness test).

...तर सचिन तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मण आंतरराष्ट्रीय सामने खेळूच शकले नसते, वीरेंद्र सेहवागचं मोठं विधान
वीरेंद्र सेहवाग
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 9:24 PM

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने खेळाडूंच्या निवड प्रक्रियेवर सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. सध्या कोणत्याही खेळाडूला सामना खेळण्यासाठी यो-यो टेस्ट पास होणं अनिवार्य करण्यात आलं आहे. ही टेस्ट खेळाडूच्या फिटनेस संबंधित आहे. मात्र, फिटनेसपेक्षा टॅलेंट जास्त गरजेचं आहे, असं सेहवाग ‘क्रिकबज’सोबत बोलताना म्हणाला. त्याचबरोबर यो-यो टेस्ट आधी असती तर सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि गांगुली कधीच पास झाले नसते, असंही सेहवाग म्हणाला (Virender Sehwag on Yo-Yo fitness test).

सेहवाग नेमकं काय म्हणाला?

“यो-यो टेस्ट पास न झाल्यामुळे कदाचित अश्विन आणि चक्रवर्ती यांना आंतरराष्ट्रीय सामना खेळता येत नाहीय. पण मी या गोष्टींना मानत नाही. टीममध्ये खेळाडूंच्या निवडबाबत अशाचप्रकारचे निकष असले असते तर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण कधीच पास झाले असते. मी स्वत: या तीनही दिग्गजांना बीप टेस्टमध्ये पास होताना नाही बघितलं. बीप टेस्टमध्ये 12.5 गुण गरजेचे होते. पण सचिन, गांगुली आणि लक्ष्मण 10 किंवा 11 गुण आणायचे. मात्र, या खेळाडूंची स्कील चांगली होती”, असं सेहवागने सांगितलं.

“मला वाटतं फिटनेसपेक्षा स्कील जास्त जरुरीची आहे. जर तुमची टीम फिट आहे आणि तुम्ही मॅच हारत असाल, खेळाडूंमध्ये स्कीलची कमी असेल तर व्यर्थ आहे. याशिवाय ते चुकीचं आहे. जे चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करतात त्यांना खेळवायला हवं. कारण असेच खेळाडू कठीण काळात चांगली कामगिरी करुन दाखवू शकतात. याशिवाय असे खेळाडू फिल्डिंगसाठी देखील फीट असतात. त्याचबरोबर खेळाडूची फिटनेस हळूहळू चांगली करता येऊ शकते”, अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली.

सेहवागच्या मुद्द्याला अजय जडेजाचं समर्थन

वीरेंद्र सेहवागचा या मुद्द्याचं माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने देखील समर्थन केलं. “जर तुम्ही स्वयंपाकी शोधत आहात तर तुम्ही त्याचं स्वयंपाकाचं कौशल्य बघाल. तुम्ही त्याला आधी धावायला सांगणार नाहीत. टॅलेंट हेच जास्त जरुरीचं आहे”, असं जडेजा म्हणाला (Virender Sehwag on Yo-Yo fitness test).

हेही वाचा : IPL 2021 : चौथ्या अंपायरची ताकद वाढली, 90 मिनिटात खेळ संपवण्याचे बंधन, IPL साठी BCCI चे नवे नियम

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.