Mumbai Indians ची साथ सोडून 15 कोटीमध्ये अहमदाबादकर झालेला हार्दिक म्हणतो, ‘केम छो अहमदाबाद…।’

हार्दिक शिवाय अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान आणि युवा ओपनर शुभमन गिल हे दोघे सुद्धा अहमदाबाद संघाचा भाग असणार आहेत.

Mumbai Indians ची साथ सोडून 15 कोटीमध्ये अहमदाबादकर झालेला हार्दिक म्हणतो,  'केम छो अहमदाबाद...।'
Hardik Pandya
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 7:01 PM

अहमदाबाद: दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर असलेल्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) अहमदाबाद फ्रेंचायजीने आयपीएल 2022 (IPL 2022) च्या आगामी सीजनसाठी कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. हार्दिक पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कुठल्यातरी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. IPL च्या पंधराव्या सीजनमध्ये एकूण दहा संघ खेळणार आहेत. यात लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन संघ आहेत.

अहमदाबाद फेंचायजीने 15 कोटी रुपये मोजून हार्दिकला विकत घेतलं आहे. हार्दिक शिवाय अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान आणि युवा ओपनर शुभमन गिल हे दोघे सुद्धा अहमदाबाद संघाचा भाग असणार आहेत. राशिद सोबत अहमदाबादने 15 कोटी रुपयांचा करार केला आहे. शुभमनला 7 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. राशिद खान आयपीएलच्या 14 व्या सीजनमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळला होता. शुभमन गिलने कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधीत्व केलं होतं.

‘केम छो अहमदाबाद…।’ हार्दिक पांड्याने शनिवारी त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ अपलोड केला असून कर्णधारपदी नियुक्ती झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ‘केम छो अहमदाबाद…।’ असे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. कर्णधारपदाची जबाबदारी संभाळण्यासाठी मी उत्सुक आहे. मालकाचेही हार्दिकने आभार मानले आहेत. व्हिडिओमध्ये हार्दिकने राशिद आणि शुभमन दोघांच स्वागत केलं आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 92 सामने खेळला आहे. यात 1476 धावा आणि 42 विकेट घेतल्या आहेत.

watch video hardik pandya says kem cho ahmedabad after appoints captain of this franchise in ipl

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.