भारतीय खेळाडूचा ऑस्ट्रेलियात धमाका, अखेरच्या षटकात षटकारांचा पाऊस, 10 चेंडूत अर्धशतक!
WBBL च्या या सामन्यात ब्रिस्बेन हीट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय चुकीचा ठरला. मेलबर्न रेनेगेड्स संघाची सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्ज आणि इव्ह जोन्स यांनी 9.4 षटकात 101 धावांची भागीदारी केली.
मेलबर्न : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला बिग बॅश लीगमध्ये (Women Big Bash League) भारतीय खेळाडूंनी धुमाकूळ घातला आहे. 6 नोव्हेंबरला, हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि जेमिमाह रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues) या दोघींनी तुफानी फलंदाजी करत मेलबर्न रेनेगेड्स संघाला 4 विकेट्सच्या बदल्यात 207 धावांपर्यंत मजल मारुन दिली. हरमनप्रीत कौरने 32 चेंडूंत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 65 धावा कुटल्या. तिने केवळ 10 चेंडूत 65 पैकी 52 धावा ठोकल्या. त्याचवेळी जेमिमाने 31 चेंडूत 10 चौकारांसह 52 धावांची खेळी केली. यानंतर हरमनप्रीत कौरने गोलंदाजीतही कमाल केली आणि 19 धावांत एक विकेट घेतली. अशाप्रकारे विरोधी ब्रिस्बेन हीटचा संघ 192 धावांवर गडगडला आणि मेलबर्न रेनेगेड्स संघाने ब्रिस्बेन हीटचा 15 धावांनी पराभव केला. हरमनप्रीत कौरला तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. (WBBL: MR vs BH, Harmanpreet kaur blasting fifty with 6 sixes, Melbourne renegades vs brisbane heat, Jemimah Rodrigues fifty)
या सामन्यात ब्रिस्बेन हीट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय चुकीचा ठरला. मेलबर्न रेनेगेड्स संघाची सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्ज आणि इव्ह जोन्स यांनी 9.4 षटकात 101 धावांची भागीदारी केली. दोघींनी झटपट धावा काढल्या. यामध्ये जेमिमा अधिक आक्रमक होती. अर्धशतक पूर्ण करून ती बाद झाली. तिने महिला बिग बॅश लीगमधील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. जेमिमा गेल्यानंतर कर्टनी वेबही लगेचच बाद झाली. तिला सात धावांचं योगदान देता आलं. त्यानंतर आलेल्या हरमनप्रीत कौरने संथ सुरुवात केली पण शेवटच्या षटकांमध्ये तिने धुमाकूळ घातला.
अखेरच्या षटकात हरमनप्रीतने गेम पलटला
सुरुवातीला हरमनप्रीत कौर सात चेंडूत तीन धावा करुन संघर्ष करत होती. तिने 14 व्या षटकात चौकार मारून डावाला गती दिली. यानंतर हरमनने 15 व्या षटकात सलग दोन षटकार ठोकले. 18 व्या षटकापर्यंत मेलबर्नची धावसंख्या तीन बाद 175 अशी होती. त्याचवेळी हरमन स्वतः 23 चेंडूत 34 धावांवर खेळत होती. तिने 19 व्या षटकात सलग दोन षटकार ठोकले. शेवटच्या षटकात तिने आणखी आक्रमक फटके मारले. पहिल्या दोन चेंडूंवर तिने चौकार आणि षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. षटकाच्या पाचव्या चेंडूवर आणखी एक षटकार ठोकला. शेवटच्या चेंडूवरही मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ती आऊट झाली. पण तोपर्यंत हरमनप्रीत कौरने तिचे काम केले होते.
The @RenegadesWBBL register the second-highest total in WBBL history! #WBBL07 pic.twitter.com/NTRfLXf9uT
— Weber Women’s Big Bash League (@WBBL) November 6, 2021
हरमनप्रीत कौर या डावात सर्वाधिक 65 धावा करणारी खेळाडू ठरली आहे. तसेच लीगमध्येदेखील तिच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. तिने 8 डावात 59.40 च्या सरासरीने आणि 137.50 च्या स्ट्राईक रेटने 297 धावा फटकावल्या आहेत.
Watching Harmanpreet Kaur bat is extremely enjoyable!
She’s our @WeberBBQAusNZ Player of the Match #WBBL07 pic.twitter.com/TBpdINXFYy
— Weber Women’s Big Bash League (@WBBL) November 6, 2021
इतर बातम्या
T20 World Cup: स्कॉटलंडविरुद्ध बुमराहने रचला इतिहास, विश्वविक्रम नावे करत बनला भारताचा ‘विकेट वीर’
(WBBL: MR vs BH, Harmanpreet kaur blasting fifty with 6 sixes, Melbourne renegades vs brisbane heat, Jemimah Rodrigues fifty)