Virat Kohli Resign: ‘विराट तू मागे डोकेदुखी…’, अश्विनने विराटचं कौतुक केलं, पण…
क्रिकेट कर्णधारांबद्दल त्याचे रेकॉडर्स, त्यांनी जे यश मिळवलय त्या बद्दल बोललं जातं. पण कर्णधार म्हणून तुझा वारसा तू जे मापदंड घालून दिलेत, त्यासाठी ओळखला जाईल.
चेन्नई: ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन (Ashwin) फक्त बुद्धिवान क्रिकेटपटूच नाहीय, तर परिणामकारक चतुराईन संवाद साधण्याचं कौशल्यही त्याच्याकडे आहे. अश्विनला काय म्हणायचं आहे, हे तो खूप हुशारीने सांगतो. विराटने (Virat Kohli) शनिवारी राजीनामा दिल्यानंतर अश्विनने आज रविवारी एकापाठोपाठ एक टि्वट करताना खूप वेगळ्या पद्धतीने विराटचं कौतुक केलं.
जी डोकेदुखी मागे सोडली, त्यावर…
“क्रिकेट कर्णधारांबद्दल त्याचे रेकॉडर्स, त्यांनी जे यश मिळवलय त्या बद्दल बोललं जातं. पण कर्णधार म्हणून तुझा वारसा तू जे मापदंड घालून दिलेत, त्यासाठी ओळखला जाईल. लोक ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका आणि अन्य देशात मिळवलेल्या विजयाबद्दल बोलतील” असे अश्विनने म्हटलं आहे. कसोटीतील यशासाठी विराटने जी पायाभरणी केली आणि जी डोकेदुखी मागे सोडली, त्यावर अश्विनने भाष्य केलं आहे.
Cricket captains will always be spoken about with respect to their records and the kind of triumphs they managed, but your legacy as a captain will stand for the kind of benchmarks you have set. There will be people who will talk about wins in Australia, England , Sl etc etc
— Ashwin ?? (@ashwinravi99) January 16, 2022
कुठलही स्थान आपल्याला…
“विजय हा फक्त एक निकाल आहे. त्याची बीज पीक येण्याआधी पेरली जातात. जी बीज तू पेरलीस, त्याचा दर्जा तू तुझ्यासाठी ठरवलास तसंच आमच्याकडूनही अपेक्षा ठेवल्यास. तू तुझ्या उत्तराधिकाऱ्यांसाठी जी डोकेदुखी सोडून गेलायस, त्याबद्दल तुझ अभिनंदन. तुझ्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात माझ्यासाठी शिकून घेण्याची ही मोठी गोष्टी आहे. कुठलही स्थान आपल्याला अशा उंचीवर सोडलं पाहिजे, तिथून आपणे अजून पुढेच जाऊ” असं अश्विनने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलय.
Integrity, insight and inclusivity.
Your contribution to the team as captain is invaluable, you’ve been a great leader to this side. It’s been a pleasure playing under you.? pic.twitter.com/K5iwPIuplZ
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) January 15, 2022
तुझं संघासाठी योगदान अमूल्य
कर्णधार म्हणून तुझं संघासाठी योगदान अमूल्य आहे. तू एक चांगला संघनायक आहे. तुझ्या नेतृत्वाखाली खेळणं खूप आनंददायी होतं, असं जसप्रीत बुमराहने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
(Well done Kohli on headache you have left behind for your successor Ashwin virat kohli Resign)