Ravi Shastri| ‘चालू दे तुमचं’, रवी शास्त्रींनी सांगितला पंत-गिल बरोबरचा शौचालयातला ‘तो’ किस्सा

"शेवच्यादिवशी जे घडलं, ते अविश्वसनीय होतं. आमच्या तीन विकेट गेल्या होत्या. त्यावेळी ऋषभला काही सांगण्यात अर्थ नव्हता. मी पायऱ्या उतरुन शौचालयात गेलो"

Ravi Shastri| 'चालू दे तुमचं', रवी शास्त्रींनी सांगितला पंत-गिल बरोबरचा शौचालयातला 'तो' किस्सा
रवी शास्त्री
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 4:57 PM

नवी दिल्ली: मागच्यावर्षी जानेवारी 2021 मध्ये भारताने गाबामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन विकेट राखून कसोटी सामना जिंकला. भारताच्या सर्वोत्तम कसोटी विजयापैकी हा एक विजय आहे. कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारत 328 धावांचे लक्ष्य पार करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. ऑस्ट्रेलियाने 1988 सालापासून गाबामध्ये एकही कसोटी गमावलेली नाही. ऋषभ पंतच्या जबरदस्त खेळामुळे भारताने क्रिकेटच्या इतिहासातील एका संस्मरणीय विजयाची नोंद केली. कोलकात्यात 2001 साली इडन गार्डन्सवर व्ही.व्ही.एस लक्ष्मणच्या 281 धावांच्या खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियावर एक अनपेक्षित विजय मिळवला होता. त्याच्याशी गाबाच्या विजयाची तुलना होते. (Went to the loo Saw them talking Shastri on Pant, Gill’s chat in Gabba Test)

लवकरच डॉक्युमेंट्री येईल, पण त्याआधी…. या ऐतिहासिक विजयाबद्दल लवकरच डॉक्युमेंट्री येईल. पण त्याआधी या सामन्यात घडलेले काही किस्से सुद्धा तितकेच रंजक आहेत. ब्रिस्बेनमध्ये पाचव्या दिवशी चहापानासाठी खेळ थांबला होता. त्यावेळचा एक किस्सा माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी नुकताच एका कार्यक्रमात सांगितला.

शेवच्यादिवशी जे घडलं, ते अविश्वसनीय होत “शेवच्यादिवशी जे घडलं, ते अविश्वसनीय होतं. आमच्या तीन विकेट गेल्या होत्या. त्यावेळी ऋषभला काही सांगण्यात अर्थ नव्हता. मी पायऱ्या उतरुन शौचालयात गेलो. दोघांमध्ये काय बोलणे झाले ते मी सांगणार नाही. गिल आणि पंत ही दोन तरुण मुल आपसात बोलत होती. गिलने 90 धावांची शानदार खेळी केली होती” असे रवी शास्त्रांनी स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात सांगितले.

मी थांबलो, त्यांचं बोलण ऐकलं “मी थांबलो, त्यांचं बोलण ऐकलं आणि सरळ चालत गेलो. चालू दे तुमचं एवढचं मी म्हटलं. मला माहित होतं, त्यांना जिंकण्यासाठी प्रयत्न करायचा होता. मला अशा प्रकारचं क्रिकेट आवडतं. असं करताना तुम्ही कदाचित पराभूत होऊ शकता. पण तुम्ही जिंकलात, तर ती खूप मोठी गोष्ट ठरते, तिथे आम्ही तेच केलं” असं रवी शास्त्री म्हणाले. त्या विजयानंतर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दुसरा मालिका विजय मिळवला. 2018/19 मध्ये 2-1 ने बॉर्डर-गावस्कर करंडक जिंकला होता. ऋषभ पंतची नाबाद 89 धावांची खेळी त्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली होती.

संबंधित बातम्या: 

Irfan Pathan: 10 वर्षाने लहान असलेल्या पत्नीसोबत इरफान पठाने शेअर केला रोमँटिक फोटो, कॅप्शनमध्ये लिहिलं….. IND vs SA: रोहित शर्मानंतर पुढचा कॅप्टन कोण? निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मांनी दिलं उत्तर टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेत 31st चं जंगी सेलिब्रेशन पाहा खास PHOTOS

(Went to the loo Saw them talking Shastri on Pant, Gill’s chat in Gabba Test)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.