West Indies t20 संघात दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन, दक्षिण आफ्रिकेविरोधात कसोटी पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहेत. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभवानंतर आता वेस्ट इंडिजचा संघ टी-20 मालिकेत विजया मिळवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करत आहे.
मुंबई : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असून नुकतीच 2 सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा दारूण पराभव केला. त्यानंतर आता 5 सामन्यांची टी-20 सामन्यांची मालिका या दोन्ही संघात पार पडणार आहे. कसोटी सामन्यांतील पराभवानंतर टी-20 संघात मात्र वेस्ट इंडिजने दिग्गज खेळाडूंचा भरणा केला असून संघाचे नेतृत्त्व अष्टपैलू केईरॉन पोलार्ड (Kieron Pollard)करणार आहे. दरम्यान टी-20 फॉर्मेटमध्ये जगातील सर्वांत धमाकेदार अष्टपैलू खेळाडू असणारा आंद्रे रस्सेल (Andre Russell) याचेही संघात पुनरागमन झाले आहे. आयसीसीने (ICC) वेस्ट इंडिज संघाच्या टी-20 टीममधील खेळाडूंची नावे ट्विटरवरुन शेअर केली. (West Indies Announced Team For t20 matches Against South Africa )
Andre Russell has been recalled to the West Indies T20I side to face South Africa ?
Full squad ?#WIvSA pic.twitter.com/gKCCYIkd3g
— ICC (@ICC) June 26, 2021
कसोटीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. मात्र त्यापूर्वी झालेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजला दारुण पराभव पत्करावा लागला. ज्यात पहिल्या सामन्यात 63 धावांनी आणि दुसऱ्या सामन्यात 158 धावांनी वेस्ट इंडिजला पराभव पत्करावा लागला. दोन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून यष्टीरक्षक कॉन्टन डी-कॉकने अप्रतिम फलंदाजी केली. दरम्यान या पराभवाचा बदला घेण्यासाठी वेस्ट इंडिज संघाने कंबर कसली असून जागात टी-20 सामन्यांत हाहाकार करणाऱ्या गेल, पोलार्ड आणि रस्सेल या त्रिकुटासह तयार झाली आहे.
हे ही वाचा :
WTC Final मध्ये पराभवानंतर श्रीलंका दौरा जिंकण्यासाठी युवा क्रिकेटपटू करतायत मेहनत, बीसीसीआयने शेअर केले फोटो
WTC Final मध्ये का पराभूत झाला भारतीय संघ?, सचिन तेंडुलकरने सांगितलं कुठे चूकला विराट कोहली
WTC स्पर्धेत अश्विनचा डंका, सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड, कांगारु बोलरला पछाडलं!
(West Indies Announced Team For t20 matches Against South Africa)